प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा झटका

मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी मात्र प्रशांत दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. पण, या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 11, 2013, 11:26 AM IST

www.24taas.com, मुंबई
मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी मात्र प्रशांत दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. पण, या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला होता.
प्रशांत दामले यांच्यावर अंधेरीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. डॉक्टरांनीही दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. डॉक्टरांनी प्रशांत दामलेंना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांचे सर्व नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आलेत.

`एका लग्नाची गोष्ट` या प्रशांत दामलेंच्या गाजलेले नाटकाचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू झालेत. त्यातच ते व्यस्त होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.