राजकुमारी नेहा हिंगे आता बॉलिवूडमध्ये

माजी `मिस इंडिया` नेहा हिंगे ही मराठमोळी मुलगी आता हिंदी सिनेमातून पदार्पण करत आहे. नेहा मध्य प्रदेशातील देवास संस्थानाच्या राजघराण्यातील राजकन्या आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 8, 2013, 04:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पटवर्धन राजघराण्यातील भाग्यश्री पटवर्धन मैने प्यार कियामधून बॉलिवूडमध्ये आली. घाटगे राजघराण्यातील विजयेंद्र घाटगेही सिनेमात आला . सैफ अली खान, सोहा अली खान या पतौडी घराण्यातल्या नवाबांनंतर आणखी एक राजघराण्यातील व्यक्ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. माजी `मिस इंडिया` नेहा हिंगे ही मराठमोळी मुलगी आता हिंदी सिनेमातून पदार्पण करत आहे. नेहा मध्य प्रदेशातील देवास संस्थानाच्या राजघराण्यातील राजकन्या आहे.
इंदुरजवळील देवास या जुन्या संस्थानाची राजकुमारी असणारी नेहा इंजिनियर आहे. तिने यापूर्वी मिस इंडिया किताबही पटकावला आहे. ती आता ‘लव्ह यू सोनियो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मूळ महाराष्ट्रीयन असणारी नेहा हिंगे आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी होण्याची इच्छा बाळगून असल्यामुळे ती तिच्या राजकुमारी असण्याचा उल्लेख टाळते.
राजघराण्यातील मुलींनी सहसा सिनेमा इंडस्ट्रीत येऊ नये, अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा असते. मात्र नेहाला तिच्या राजघराण्याकडून पूर्ण पाठिंबा आहे. तिच्यात टॅलेंट आहे. ती सुंदर आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे मुलीला पाठिंबा देणंच योग्य असल्याचं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.