'अँक्शन' रिप्लेची 'अँक्शन'

पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत.

Updated: Dec 21, 2011, 10:52 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत. जुन्या संगीत नाटकातली गाजलेली गाणी या नाटकात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये गुंफण्यात आली आहे.

 

शिवाय ऑडिओ व्हिज्युअल माध्यामाचा वापरही या नाटकात करण्यात आला आहे. दिग्दर्शक विजय गोखले आपल्या या अनोख्या प्रयोगाबद्दल भरभरुन बोलत आहेत. अनेक संगीत नाटकातून दिसणारा गौरी पाटील हा ओळखीचा चेहरा  या नाटकातून पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे.

 

संगीत नाटक म्हंटलं की पारंपरिक वेशातले कलाकार नेहमीच आपल्या समोर येतात. मात्र नव्या पिढीला आपंल वाटेल असा कॉन्टेपररी फॉर्म संगीत एक्शन रिप्ले मध्ये वापरण्यात आला आहे. त्यामुळे हे नाटक आजच्या तरुण पिढीला नक्कीच नाट्यगृहाकडे खेचण्यात यशस्वी होईल असा विश्वास या नाटकाच्या टीमला वाटतो  आहे.