आइस्क्रीमचे उन्हाळ्यात फायदे - Marathi News 24taas.com

आइस्क्रीमचे उन्हाळ्यात फायदे

www.24taas.com, मुंबई
 
 
उन्हाळ्यात  प्रत्येकालाच थकवा जाणवत असतो. शरीरातील पाणी कमी होते. खूप घाम  जात असतो. त्यामुळे आपल्याला दमल्यासारखे होते. यावर आपण आइस्क्रीम खाल्ला तर ! एका सर्वेक्षणानुसार काही डेअरी प्रॉडक्ट जसे चीज आणि आइस्क्रीम यांद्वारे देखील शरीरास कॅल्शियम मिळते. आइस्क्रीम खाल्याने शरीरास  व्हिटॅमिन डी,ए, बी12 मिळण्यास मदत होते. त्यामुळे आइस्क्रीम खाणे आरोग्यदायक आहे.
 
 
सध्या बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आइस्क्रीम उपलब्ध आहेत, पण सगळ्यात लोकप्रिय फ्लेवर स्ट्रॉबेरी,व्हॅनिला,चॉकलेट आणि फ्रेश कॉफी आहेत.दुध,क्रिम,साखर आणि सुगंध यांच एकत्रित मिश्रण म्हणजे आइस्क्रीम. त्यामुळेच उन्हाळ्यात होणार्‍या समारंभात आइस्क्रीम ठेवण्यात येते. उन्हाळ्यात  प्रत्येकालाच थकवा जाणवत असतो. अशावेळी आइस्क्रीम  खाल्ल्याने आपल्याला एनर्जी मिळते आणि आलेला थकवा दूर होतो.
 
 
एका संशोनातून स्पष्ट झाले आहे की, आइस्क्रीममध्ये कॅल्शीअम असते. त्यामुळे आपल्या हिरड्यांना आणि हाडांना त्यामुळे बळकटी मिळते. तसेच आपली स्कीन मुलायम होण्यास मदत होते. त्यामुळे आइस्क्रीम  केव्हाही खाल्ले तरी चालेल. मात्र, अति खाऊ नये तर ते प्रमाणात खाल्ले पाहिजे.  काही डेअरी प्रॉडक्ट जसे चीज आणि आइस्क्रीम यांद्वारे देखील शरीरास कॅल्शियम मिळते. आइस्क्रीम खाल्याने शरीरास  व्हिटॅमिन डी,ए, बी12 मिळण्यास मदत होते. शरीरातील हाडांना मजबूत करण्यासाठी आणि  त्वचेला मऊ बनवण्यासाठी आइस्क्रीमचा फायदा होतो.
 
 
आइस्क्रीम  हा नसांसाठी आणि रक्त भिसरण (प्रवाह) होण्यासाठी लाभदायक आहे. रोज  अर्धाकप आइस्क्रीम  खाल्लाने शरीराला १० टक्के प्रोटीन मिळते. दात पडल्यानंतर आइस्क्रीम  खल्ल्याने आराम  मिळतो आणि रक्त प्रवाह थांबतो. त्यामुळे आइस्क्रीम खाणे चांगले आहे हे नक्की.
 

First Published: Tuesday, May 01, 2012, 13:33


comments powered by Disqus