मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी..., How will You Celebrate this Years Diwali

मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...

मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
www.24taas.com,मुंबई
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
दिवाळी म्हणजे नक्की काय तर मातीपासून बनवलेल्या सुंदर पणत्यांमध्ये तेलाचा दिवा उजळवून अज्ञानारूपी अंधकारचा शेवट करायचा असतो. असं केल्याने जुन्या वाईट गोष्टी नष्ट होऊन, नव्या प्रकाशाचा, नवनवीन उत्साही गोष्टींचा जन्म होतो. पण काही व्यक्ती दिव्य प्रकाशांचा हा सण साजरा करण्यासाठी असुरक्षित मार्गांचा अवलंब करताना दिसतात.


मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...

तुम्हीही सुरक्षितरित्या दिवाळी कशी साजरी कराल आणि सोबतच पर्यावरणालादेखील कसं साभाळालं... यासाठी या काही छोट्याशा टीप्स...
• नेहमी अधिकृत कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडूनचं फटाके खरेदी करावे.
• आजारी आणि वृध्द व्यक्तींपासून एखाद्या सुरक्षित ठिकाणी फटाके पेटवावे.
• फटाके पेटवताना पायांमध्ये चप्पल घालायला विसरू नये.
• सावधगिरीसाठी नेहमी फर्स्ट एड बॉक्स, पाणी किंवा वाळू भरलेली बादली नेहमी जवळपास ठेवावी.
• फटाके जाळताना लहान मुलांना नेहमी लांब ठेवावे.
• अडचणीच्या जागी रॉकेट सारखे फटाके जाळणे टाळावे विशेषतः जेव्हा त्या ठिकाणी विद्युत उपकरणांच्या तारा असतील किंवा घराच्या उघड्या दरवाज्यांतून किंवा खिडक्यांमध्ये शिरण्याची शक्यता असेल त्यावेळी असे धोकादायक फटाके उडवू नये.
• फटाके उडवताना विशेषतः कपड्यांची काळजी घ्या. ह्या वेळी सैल कपडे घालणे टाळा. तसेच स्कार्फ आणि ओढणी असल्यास काळजीपूर्वक फटाके जाळा.
• स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेच्या आधी किंवा नंतर फटाके पेटवू नयेत.
• जाळलेल्या फटाक्यांना पाण्याच्या किंवा वाळूच्या बादलीत टाकून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट करावी.
• दिवाळी सणादरम्यान पाळीव प्राण्यांना घरातच ठेवावे.
मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...

या सर्व महत्त्वाच्या बाबींखेरीज, अजून काही विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या म्हणजे दिवाळी सणानिमित्त फटाके तयार करण्यासाठी छोट्या मुलांना कामाला लावले जाते. फटाके बनवण्यासाठी विषारी पदार्थांचा वापर केला जातो आणि याच विषारी पदार्थांची बाधा झाल्याने लहान मुलं आजारी पडतात.
फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठ्या प्रमाणात आवाज येणाऱ्या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपेसंबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संर्पकात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता आहे.
सर्व प्राणीमात्रांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. आशा आहे की हे वाचून तरी तुम्ही प्रोत्साहित होऊन येणारी दिवाळी फटाक्यांना राम-राम करून सुखांच्या आणि आनंदाच्या फटाकांसोबत साजरी कराल.

First Published: Friday, November 02, 2012, 18:09


comments powered by Disqus