Zeenews logo
English   
Wednesday, May 22, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

थर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी
 
कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.
 
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळ निमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.तारकर्ली, गणपतीपुळे, मुरूड, दापोली, रत्नागिरी येथील सर्व रिसॉर्ट २४ डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत फुल्ल झाली आहेत. सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
 
पर्यटन विकास महामंडळाकडे आरक्षण उपलब्ध नसल्यानं पर्यटकांनी खासगी रिसॉर्टकडे धाव घेतली आहे. गजबटाला कंटाळलेल्या विदेशी पर्यटकांनी शांत अशा कोकणच्या समूद्र किना-यावर  मुक्काम ठोकला आहे.गोव्यापेक्षा रत्नागिरीतील पर्यटनस्थळं स्वच्छ आणि सुंदर असून इथली शांतता मन प्रसन्न करणारी असते,अशा शब्दात विदेशी पर्यटक कोकणचं वर्णन करतात.
 
बीच फेस्टीव ,कासव महोत्सव,सह्यांद्री महोत्सव अशा उपक्रमांनाही पर्यटकांची हजेरी लागणार असल्यानं पुढचे दहा दिवस कोकण पर्टकांच्या गर्दीनं  अक्षरश: फुलून जाईल.
 
येवा कोकण आपलाच असा

 
 
 

First Published: Saturday, December 31, 2011, 08:45

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: