दिवस विश्वक्रांतीचा Divas Vishwakranticha

दिवस विश्वक्रांतीचा

दिवस विश्वक्रांतीचा
www.24taas.com, मुंबई

१२ फेब्रुवारी २००१ ही तारीख भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे.. आणि या टप्पावरच आज १२ वर्ष पुर्ण झाल्यानंतर या सिद्धांतावर बोलणं महत्वाच आह.. गुणसूत्रांचा सूसुत्र अभ्यास झाल्यावर तुम्हाला तुमच्या डिएनए, आरएनएचा अभ्यास करुन तुम्हाला खास तुमच्या प्रकृतीसाठी योग्य असणारी औषधं मिळणार आहेत.. केवळ एवढच नाही तर भविष्यात निरोगीच आणि शतायुषी पिढी जन्माला येणार आहे..

विश्वात असिमीत अशा दोनच गोष्टी आहेत. एक ह्या विश्वाचा पसारा आणि दूसरा म्हणजे माणसाचा वेडेपणा. त्यातील पहिला भाग एक दिवस कदाचित आपल्याला सिमीत दिसेल. पण माणसाचा वेडेपणा हा मात्र नेहमीत असिमीतच राहील

अल्बर्ट आईनस्टाईनची हे वाक्य आज काळाच्या कसोटीवर पुन्हा खरं ठरतय.. खरतर गंमतीनं, वेडेपणा हा गुणसूत्रातच असतो असं म्हणून सत्य नाकारण्या-या माणसांच्या दुनियेत काही माणसांना आता मानवाच्या गुणसूत्रांच्या अभ्यासाचांच जणू वेड लागलय.. होय.. क्रेग व्हेटॉर या जिवशास्त्रात १२ फेब्रुवारीची विश्वक्रांती घडवणा-या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आता नवनवे आयाम मिळतायत.. डीएनएचे फ्रिक्वेसींग किवा जनूकांच्या गुणसूत्रांचे वर्गीकरण करणं ही खर्चिक प्रक्रिया पार पाडत, क्रेग यांनी जगासमोर आणलेल्या सिलीको बायोलॉजीच्या सिध्दांताला आता एक तप उलटतय.. त्यावेळी यासाठी सुमारे १५० हजार कोंटीचा डॉलरचा खर्च आला होता.. त्या सिलीको बायलोजीवर आता पुन्हा नव्यानं संसोधन सुरुच आहे. जीन्स म्हणजे नेमक काय ? अनुवाशिंकेता नेमकी कोणत्या गुणावर ठरते? आपले जीन्स भविष्यात कसे हस्तातंरण करता येईल? अशा नानाविध प्रश्नांवर संशोधक काम करतायत.. पण त्याचवेळी हा प्रचंड खर्चही महत्वाचा आहे.. १२ वर्षानंतर या सुरुवातीच्या दीड हजार कोटी डॉलर खर्चात एक हजार पटीनं घट झालीय, त्याचप्रमाणे आणखी तीन ते चार वर्षात हा खर्च हजारपटीनं कमी होईल असा दावा करण्यात आलाय.. पण याचबरोबर आता हा खर्च कमी करण्यासाठी आर्चोन एक्स ही दहा मिलीयन डॉलरची एक स्पर्धाही ठेवण्यात आलीय.. जो संशोधक १०० ह्युमन जेनॉमचे १०,००० डॉलरमध्ये डिकोटींग करेल त्याला हे बक्षीस मिळणार आहे.. अर्थात हे जर संशोधकाना शक्य झालं,तर नव्या विश्वक्रांतीला सामोरं जाताना आपल्यालाही याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे.. या सा-या अभ्यासात महत्वाची ठरणार आहेत ती म्हणजे मानवाची मुलपेशी

गर्भ म्हणजे ऐंब्रॉयनिक मूलपेशी आणि प्रौढ म्हणजे एडल्ट मूलपेशी अशा दोन मूलपेशीत शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केलं आहे. जन्मलेल्या बाळाची नाळ ही माणसाच्या आयुष्यभऱासाठी महत्वाची ठरणार आहेत. गर्भनाळेतील हेमेटोपोएटीक आणि मिझलनकेमल या दोन मूलपेशी असतात.. जन्मलेल्या बाळापासून मिझनकेमल या पेशी वेगळ्या करता येतात. आणि त्यांच सर्वंधन करुन भविष्यात त्याच व्यक्तीच्या हृद्यविकारासारख्या अनेक अनुवांशिक आजारावर महत्वाच्या ठरु शकणार आहेत.. २००८ साली दातातल्या मूलपेशीचा वापर करुन मेंदूवर उपचार करण्यात आले होते.. त्यामुळे हा सिद्धांत भविष्यात आवाक्यात आला तर मानवाला आपली नाळ संवर्धन करणं शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे मिझलनकेमल या मूलपेशीचा अभ्यास करुन त्या व्यक्तीच्या डीएनए प्रमाणे वर्गीकरण करुन योग्य तीच औषध देता येणार आहे. पर्सनालाझीज औषधं ही संकल्पना ख-या अर्थानं रुजेल.

डीएनएचा अभ्यास आणि त्याप्रमाणे उपचार ही संकल्पना आता काळानं आपल्या उंबरठ्यावर आणून ठेवलीय. १२ फेब्रुवारीला २००१ ला याच नव्या विश्वक्रांतीची नांदी ठरली.. आणि आता एका तपानंतर यात अनेक बदल होतायत.. पुढची पिढी याच संशोधनात कदाचीत जन्मेलही आणि सुखी निरोगी आयुष्य जगेल.. पण ही पुढी केवळ सुदृढ शतायुषी माणसं असतील कि विचारहीन पण संवेदना असलेला माणूस नावाचं एक यंत्र या प्रश्नाच उत्तर मिळालं नाहीय.. कदाचित तो पर्यंत आपण वाट पहायची त्या संशोधनाची किवा जुआन एनरिक जे यांच्या ‘एज द फ्यूचर इफ यु कॅन’ यांच्या पुस्तकातल्या त्या गोष्टी सत्यात उतरण्याची..

मानवी देहावर गेली अनेक वर्ष संशोधन होतय.. पण तरीही आजपर्यंत जीवशास्त्रातून उलगडल्या गेल्यायत अवघ्य़ा ६० टक्के गोष्टींची रहस्य.. यावरुन समजेल की या मानवी देहाबद्दलचा अभ्य़ासाचा केवढा पल्ला गाठायचा.. डीएनए, गुणसूत्रे याबाबत क्रेग व्हेंटर यांचा सिलीका बायोलॉजी बदद्ल अभ्यास सुरु होता.. पण त्याच वेळी नेचर आणि सायन्स या जर्नल त्याबद्दल सगळी माहीती अगोदर प्रसिद्ध झाल.. आणि सगळीकडे प्रचंड खळबळ माजली. आज १२ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या सिद्धांताचे अवलोकन करणार आहोत.. कारण भविष्याच्या उंबरठ्यावर भूतकाळाचा अभ्यास वर्तमानाचं भान करणारा असाच आहे..

११ सप्टेंबर २००१

या दिवशी तुम्ही कुठे होता ?

२६ जुलै २००५

या दिवशी तुम्ही कुठे होता ?

२६ नोव्हेंबर २००८

या दिवशी तुम्ही कुठे होता ?

अशीच एक तारीख

१२ फेब्रुवारी २००१

या तारखेला तुम्ही कुठे होता, आठवतय का?

काय घडलं होतं या दिवशी

याच दिवशी सुरुवात झाली एका नव्या विश्वक्रांतीची...

दिवस विश्वक्रांतीचा..

ब्रम्हांड.. अगणिक ग्रहांच, आकाशमंडळाचं आणि कुतहूलानं भारलेल्या मनुष्यप्राण्याची वस्ती असलेल्या पृथ्वीच एक जग... अनेक शोधांच्या प्रश्नात हरवत असलेला माणूस अनंत काळापासून शोध घेतोय ब्रम्हांडाचा आणि त्याचबरोबर स्वताच्या अस्तित्वाचा.. याच अस्तित्वाचा मानवी अभ्यास करणारं जीवशास्त्रही थीटं पडावं एवढं प्रगाढ ज्ञान लपून राहीलय, माणसापासून स्वताच्याच देहाचं..पण माहितीच्या तंत्रज्ञानात हरवलेला माणूस हिम्मत हरलेला मात्र मुळीच नाहीय.. तो शोध घेतोय स्वताचा... विज्ञानाच्या सहाय्यानं, निसर्गचक्रात बदल होत, अनेक विनाशपर्व मानवाला आव्हान देत असतानाही त्याचा अभ्यास संपत नाही.. डार्विनच्या सिद्धांतापासून ते डॉली नावाच्या मेंढीपर्यंतच नाही तर त्यापुढेही मानवाचा स्वतहा बद्दलचा अभ्यास न संपणारा असाच आहे.. अशाचं एका अभ्यासपर्वातली एक तारीख म्हणजे ११ फेब्रुवारी २००१.. आय़ुष्यचक्रात, दिनमानाच्या रहाटगाड्यात एका दशकापर्वी नेमंक काय घडलं होत याची आठवण कदाचित कुणालाच नसेल.. वाईट घटनांच्या स्मृतीनी भरुन गेलेल्या आपल्या आठवणीच्या कॅलेंडरमध्ये या तारखेदिवशी नोंद झाली होती एका नव्या शुभारंभाची..

अनेक शास्त्रज्ञ दरदिवशी नवनव्या शोधात मग्न असतात.. असाच एक संशोधक शास्त्रज्ञ- क्रेग व्हेटॉर. इतर जीवशास्त्रज्ञांपेक्षा क्रेग फार वेगळा विचार करत होता.. क्रेगनं जे संशोधन जगासमोर मांडलं त्यानी अवघ जिवशास्त्र ढवळून निघालं.. विज्ञानविश्वात राहूनही अनेकांना ती गोष्ट अविश्वसनीय अशीच वाटली.. डीएनए किवा मानवी गुणसूत्रांच्या बाबतीत क्रेग व्हेटॉर यांनी एक नवा सिद्धात जगासमोर आणलाय.. खरतर मानवीय जनुकांच्या बाबतीत खरा अभ्यास झाला तो सत्तरच्या दशकात.. ह्युमन जेनॉमचा अभ्यास करण हे सुरुवातीला फार अवघड आणि खर्चिक होतं.. जनुकांच्या अभ्यास आणि गुणसूत्रांची उकल समजायला १५० कोटी डॉलर एवढा खर्च यायचा. या सगळ्यावरच क्रेग व्हेटॉर यांनी एक नवा सिद्धांत जगासमोर मांडलाय.. माहिती तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास करुन क्रेग यांनी या संशोधनासाठी एक नवी संज्ञा विकसित केलीय, सिलिको बायॉलॉजी... एका दशकापुर्वी आलेलं हे संशोधन अतिशय क्रांतीकारी आहे. आज जरी हे संशोधन खर्चिक असलं तरी भविष्यात या संशोधनासाठी खर्च कमी व्हावा यासाठीही प्रयत्न चालू झालेत.. सुरुवातीचा १५० कोटी डॉलरचा खर्च आज १ हजारपटीनं कमी झालाय आणि आगामी तीन चार वर्षात हा खर्च हजारपटीन कमी होईल.. आज जरी या तंत्रज्ञानापासून आपण अनभिज्ञ असलो तरी लवकरच टेस्ट ट्युब बेबी किवा सरोगसीसारखच याही तंत्रज्ञानाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे..

अल्गोरिदम आणि बायोलॉजी यांच्या विलक्षण एकत्रित अभ्यासानं बारा वर्षापुर्वी सुरुवातील मांडलेलं तत्वज्ञान आता हळूहळू वास्तवात यायला सुरुवात झालीय. २००१ ला मांडलेल्या या सिद्धात केवळ मनुष्याच्या सध्याच्या पिढीचा नाही तर भविष्याचा विचार करण्यात आलाय.. आणि हे तत्वज्ञान थेट आधारलय प्रत्येक माणसाच्या भिन्न असणा-या गुणसुत्रावर.. प्रत्येकाच्या गुणसूत्राचा स्वतंत्र अभ्यास आणि त्यावर मांडली जाणारी त्याची स्वताची वैद्यकिय परिमाणांची रचना.. आजही जरी स्वप्नवत कल्पना असली तरी हे वास्तव आज आपल्या उंबरठ्यावर येवून ठेपलय.. आणि आता वेळ आलीय आपण उघड्या डोळ्यांनी याचा स्वीकार करण्याची..

First Published: Wednesday, February 13, 2013, 00:03


comments powered by Disqus