Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

पगाराला पीएफची कात्री

Thursday, December 13, 2012, 23:57
Comments 5
 
पगाराला पीएफची कात्रीहोय... तुमच्या पगाराला कात्री लागू लागण्याची शक्यता आहे..कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलेरी ऐवजी विविध भत्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे..जर असं झालं तर दरमहा पगारातून कापल्या जाणा-या पगाराच्या रकमेत वाढ होईल आणि पर्यायाने दरमहा तुमच्या हातात मिळणारी पगाराची रक्कम कमी होईल..

होय... देशातील पाच कोटी नोकरदार लोक आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे..एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात एपीएफओ संदर्भात नवीन नियम लागू करण्याची तयार करण्यात आलीय..

पगाराच्या मुळ रक्कमेत ( बेसिक सॅलेरी) सर्व भत्त्यांचा समावेश करुन त्यावर पीएफची रक्कम पगारातून वजा केली जाणार! विद्यमान नियमानुसार मुळ वेतनाच्या (बेसिक सॅलेरी ) रक्कमेवर पीएफ निश्चित केला जातो ! पीएफ निश्चित करतांना सर्व भत्यांचा समावेश केल्यास प्रत्येक्षात हातात पडणारी पगाराची रक्कम कमी होणार ! पण या नवीन नियमामुळे नोकरदारांची बचत होणार !

या नवीन नियमांचा पगारावर कोणता परिणाम होणार यावर आता एक नजर टाकू...


समजा एका व्यक्तिचा पगार ३८ हजार रुपये आहे

त्याचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये

कन्व्हेन्स अलाऊंस ५ हजार रुपये

नाईट शिफ्ट अलाऊंस ३ हजार रुपये आहे...त्यातून पीएफची रक्कम किती वजा केली जाते. आजच्या नियमानुसार मूळ वेतनाच्या रक्कमेवर पीएफची रक्कम निश्चित केली जाते...

जर एखाद्या व्यक्तीचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये असेल तर ७ हजार २०० रुपये पीएफ वजा केला जातो. पीएफची रक्कम निश्चित करतांना मुळ वेतनासोबतच अन्य भत्यांच्या रक्कमेचाही समावेश केल्यास काय होईल? त्यावर आता एक नजर टाकू या...


जर एका व्यक्तिचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये

त्यामध्ये दोन्ही भत्त्यांचा समावेश केला जाणार

वेतनाची रक्कम ३८ हजार होणार

त्यामुळे ९ हजार १२० रुपये पीएफची रक्कम वजा होणार


प्रत्यक्षात मिळणा-या वेतनावर कोणता परिणाम?

जर एखाद्या व्यक्तिचं मुळ वेतन ३० हजार रुपये असेल आणि


विद्यमान नियमानुसार ७ हजार २०० रुपये पीएफ वजा केला जात असेल तर नव्या नियमानुसार ९ हजार १२० रुपये पीएफची रक्कम म्हणून वजा केली जाणार.

जर पीएफच्या रक्कमेपैकी आर्धी रक्कम ही कंपनीकडून दिली जात असेल तर तुम्हाला प्रत्येक्षात मिळणारी रक्कम ९६० रुपयांनी कमी होईल..पण जर पीएफची संपूर्ण रक्कम कर्मचा-याच्या वेतनातून जात असेल तर प्रत्येक्षात मिळणारी पगाराची रक्कम १९२० रुपयांनी कमी होईल..



खरं तर यामुळे कर्मचा-याची बचत वाढणार आहे..तसेच दिर्घकाळानंतर कर्मचा-याच्या पीएफ अकाऊंटमध्ये मोठी रक्कम जमा होईल..



नवीन पीएफ नियमामुळे प्रत्येक्षात मिळणा-या पगाराची रक्कम कमी होणार असली तरी तसं काळजी करण्याचं कारण नाही...कारण आजची बचत निवृत्तीनंतर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमावलीवर अमंलबजावणी करण्या आल्यास एक बाब निश्चित होईल ..आणि ती म्हणजे दरमहा तुमच्या पगाराची रक्कम कमी होईल..पण भविष्यासाठी तुमच्याकडं मोठी रक्कम जमा होईल..


पीएफ संदर्भातल्या या नवीन नियमानुसार काही प्रमाणात तोटा होणार आहे तर भविष्यकाळाचा विचार केल्यास हे नवीन नियम कर्मचा-याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत..

आजच्या परिस्थितीत पीएफच्या रक्कमेवर नजर टाकल्यास मुळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफ म्हणून वजा केला जाते. तर सरकारी कर्मचा-यांचा पीएफ हा मुळ वेतन आणि डीएच्या १२ टक्के इतका असतो. मात्र नवीन नियमानुसार मुळ वेतनामध्ये अन्य भत्त्यांचा समावेश करुन त्याच्या १२ टक्के पीएफ वजा केला जाणार आहे. भत्त्याचा अर्थ असे भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून सगळ्या कर्मचा-यांना समान दिले जातात..पण नवीन नियमानुसार सर्व कर्मचा-यांना दिले जाणारे समान भत्ते पीएफच्या कक्षेत येणार.

काही भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून काही ठरावीक कर्मचा-यांनाच दिले जातात..त्यामध्ये मोबाईल फोन, टेलिफोन, इंटरनेटचं बिलचा समावेश होते... अशा भत्त्यांचा पीएफच्या कक्षेत समावेश केला जाणार नाही...


पूर्वी कशा पद्धतीने तुमच्या पीएफची रक्कम निश्चित केली जात होती आणि आता नवीन पद्धतीने ती कशा पद्धतीने निश्चित केली जाईल यावर एक नजर टाकूया...ढोबळ मानाने एका कर्मचा-याच्या वेतनात मुळ वेतनाचा समावेश असतो..


मुळे वेतनाबरोबरच घरभाडे भत्ता, मेडिकल, कन्व्हेन्स त्यामध्ये प्रवास भत्ता, पर्सनल, मनोरंजन,शिक्षण, एलटीए अर्थात लिव्ह ट्रॅव्हल अलाऊंसचा समावेश असतो..या व्यतिरिक्तही अन्य भत्यांचा समावेश असतो..



पूर्वी मुळे वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफ म्हणून वजा केली जात असे त्यामध्ये डीए, महागाई भत्ता, रिटेनिंग अलाऊंस आणि फू़ड कन्सेशनचा समावेश असतो.. एक बाब नेहमी लक्षात ठेवा...


घरभाडे भत्त्याचा कधीही पीएफमध्ये समावेश नव्हता. तसेच नवीन नियमानुसारही घरभाडे भत्त्याचा पीएफमध्ये समावेश होणार नाही. मात्र ईपीएफओच्या नवीन निय़मानुसार अनेक भत्त्यांचा समावेश पीफची रक्कम निश्चित करतांना केला जाणार आहे..त्यामुळे तुमच्या वेतनातील मोठा हिस्सा पीएफमध्ये वर्ग केला जाणार आहे..

जर तुम्ही सरकारी खात्यात कामाला असाल तर तुमच्य़ा पगारातील किती टक्के रक्कम पीएफमध्ये जमा होईल आणि जर तुम्ही खासगी कंपनीत कामाला असाल तर तुम्हाल पगाराची किती रक्कम मिळेल यावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत...

एखाद्या खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या व्यक्तिला महिना ५० हजार रुपये पगार आहे..त्याचं मुळ वेतन ३० हजार रुपये आहे..याशिवाय एचआरए भत्ता ८ हजार रुपये, एलटीए भत्ता ३ हजार रुपये, मेडिकल भत्ता १२५० रुपये,कन्व्हेन्स भत्ता ४ हजार रुपये, मनोरंजन भत्ता १५०० रुपये आणि पर्सनल भत्ता २२५० रुपये दिला जातो...



विद्यमान परिस्थितीत केवळ ३० हजार रुपयाच्या १२ टक्के अर्थात ३६०० रुपये महिन्याला पीएफची रक्कम वजा केला जातो. तेवढीच रक्कम कंपनीकडून पीएफ खात्यात जामा केली जाते. त्यामुळे कर्मचा-याच्या पीएफ खात्यात दरमहा ७ हजार २०० रुपये इतकी रक्कम जमा होते...


परंतू नवीन नियमानुसार एचआरए वगळता सगळ्या भत्त्यांचा पीएफमध्ये समावेश होईल अर्थात ४२ हजार रुपयांवर पीएफ निश्चित केला जाईल..अशाच पद्धतीने ५० हजार रुपये वेतन असलेल्या व्यक्तीच्या पीएफ खात्यात दरमहा १० हजार ८० रुपये जमा होतील...याचाच अर्थ पूर्वीच्या तुलनेत २८८० रुपये जास्त जमा होणार


ईपीएफओच्या नवीन नियमांचा सरकारी कर्मचा-यांना प्रत्येक्षात मिळणा-या वेतनावर कोणता परिणाम होते ते आता आपण पहाणार आहोत...समजा एखाद्या सरकारी व्यक्तीचं एकूण वेतन ५० हजार रुपये आहे..त्यामध्ये मुळ वेतन - २० हजार रुपये,७२ टक्के महागाई भत्ता - १४४०० रुपये,एचआरए - १० हजार रुपये,कन्व्हेन्स - ५६०० रुपयांचा समावेश होते..


आजच्या परिस्थितीत सरकारी कर्मचा-याचं मुळ वेतन आणि डीएच्या रक्कमेवर दरमहा पीएफ जमा केला जातो..याचाच अर्थ ५० हजार रुपये वेतन असलेल्या सरकारी कर्मचा-याच्या पीएफ खात्यात दरमहा ८२५६ रुपये पीएफ जमा होतो..त्याच्या पगारातून ४१२८ रुपये वजा होतात.. मात्र नवीन नियमानुसार सरकारी कर्मचा-यांचा एचआरए वगळता मुळ वेतनात डीए तसेच अन्य भत्यांचा समावेश होणार. याचाच अर्थ नवीन नियमानुसार पीएफची रक्कम ४१२८ रुपयांवरुन ४८०० रुपये होणार आहे...या रक्कमेत कंपनीच्या हिश्शाचा समावेश केल्यास कर्मचा-याच्या खात्यात पूर्वी ८२५६ रुपये जमा होत असतं तर आता ती रक्कम ९६०० रुपये इतकी होईल... म्हणजेच पीएफ खात्यात १३४४ रुपये अधिक जमा होतील..

ईपीएफओच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचा-याला रिवॉर्ड मिळाल्यास ती रक्कम पीएफसाठी गृहीत धरली जाणार नाही....अशाच प्रकारे खासगी कंपनीत दरवर्षी कर्मचा-यांना देण्यात येणारा इन्सेंटीव्ह आणि बोनसची रक्कम पीएफसाठी गृहीत धरली जाणार नाही...


First Published: Thursday, December 13, 2012, 23:57

प्रतिक्रिया

Kapil Suresh Nimabalkar - Bangalore
from my point of view it would be very profitable in my future days after my retirement.
प्रतिक्रिया द्या

anand nivrtti suryawanshi - mumbai
niama nusar ha tika ahi parantu aj kalcha ghadamodit ha kai chal nar nahi karan mhagai etaki vadlil hai ki kami pagarat ghar chlat naih.......? ``taymul vichar puravk yagay ti racam pf mada taka..``......!
प्रतिक्रिया द्या

Yeole Harshal Dileep - Malegaon(Nasik)
monthly family cost management kase karave.....ha tar sarvat gambhir prashn asanar aahe? please, yavar todaga nighayala hawa.
प्रतिक्रिया द्या

AJIT ANNAT PASHILKAR - ROHA-RAIGAD
please creat p.f. on monthly total gross salary but dont remove hra allow.
प्रतिक्रिया द्या

vijay patil - nashik
this provision is not perfect, who worker any exp. cannot adquete
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: