सूर्याचं वरदान solar blessing

सूर्याचं वरदान

सूर्याचं वरदान
www.24taas.com, मुंबई

आशिया खंडातील सर्वोत मोठा सौरऊर्जा प्रकल्प येत्या ३१ मार्चला धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात कार्यान्वीत होत आहे..दिडशे मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प अत्यंत जलदगतीने उभारण्यात आलाय. राज्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..

देशातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्याची निवड का करण्यात आली असावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. अंतराळ संशोधनातील सर्वोच्च संस्था नासाने या संदर्भात एक अहवाल दिला होता. धुळ्याच्या शिवाजीनगर परिसरातील भौगोलीक परिस्थिती सौरऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत पोषक असल्याचं नासाने म्हटलं होतं आणि त्यामुळेच हा इथं उभारण्यात आला..

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील ज्या परिसर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय तो मुलत: आदिवासी बहूल परिसर आहे..या परिसरातील लोक दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करतात...पण या सौरऊर्जा प्रकल्पामुळे हे स्थलांतर थांबलंय.


देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यात कार्यान्वीत होत असल्यामुळे भविष्यात धुळे जिल्ह्याला एनर्जी हब अशी नवी ओळख मिळणार आहे..या जिल्ह्यात पवन ऊर्जा निर्मितीचं काम यापूर्वीच सुरु झालं असून दोन मोठे थर्मल पॉवर प्रकल्प लवकरच आकारास येणार आहेत..

First Published: Monday, March 25, 2013, 23:26


comments powered by Disqus