१२.१२.१२ 12.12.12

१२.१२.१२

१२.१२.१२
www.24taas.com,मुंबई

गेले काही दिवस इंटरनेपासून ते नाक्यापर्यंत ज्या गोष्टीची चर्चा होती...ती म्हणजे १२.१२.१२ ही तारीख. या दिवसाचं महत्व म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष या तिन्हींचा अंक एकच आहे..आणि तो कोणत्याही परिस्थितीत साधण्यासाठी अनेकांनी आटोकाट प्रयत्न केला...

खरंतर प्रत्येक आठवड्यात एक बुधवार असतोच...पण या बुधवारचं महत्व काही वेगळचं आहे..जरा या तारखेवर नजर टाका....12 डिसेंबर 2012. या शतकातील दिवस, महिना आणि वर्ष यांचा अंक समान असलेली ही एकमेव तारीख आहे. त्यामुळेच या दिवसाला मोठं महत्व प्राप्त झालं आहे...

12.12.12 हा अंक त्यामागच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे...नवीन व्यवसाय सुरु करण्यापासून ते लग्न आणि मुलाला जन्म देण्यापर्यंत अनेकांनी हाच दिवस निवडला होता...

12.12.12 या तारखेत केवळ सारख्या अंकांच्या संयोगा व्यतिरिक्त आणखी काही वेगळं महत्व आहे का ? हाच खरा प्रश्न आहे. अंकशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार १२.१२.१२ ही तारीख शुभ आहे...तर ज्योतिषशास्त्रांच्या जानकारांनी ही तारीख अशुभ ठरवलीय कारण या दिवशी आमवस्या आहे....ही तारीख म्हणजे केवळ आकड्यांचा योगायोग असल्याचं म्हटलंय...हा दिवस शुभ किंवा अशुभ नसल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. १२.१२.१२ ही तारीख अनेक गैरसमजुती घेऊन आलीय. पण प्रश्न हा आहे की 12.12.12 ही तारीख केवळ अंकाचा संयोग ? की 12 चा खेळ एक मार्केटिंग फॉर्म्यूला? आहे..कारण या तारखेच्या आडून काहींना आपली पोळी भाजून घ्यायची आहे...१२.१२.१२ ही तारीख लक्षात घेऊन आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी काही दाम्पत्यांनी चक्क टेस्टट्यूब बेबीचा मार्ग निवडलाय. सुरतच्या आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. पूर्णिमा नाडकर्णी यांच्यांवर गेल्या दिवसात कामाचा ताण वाढला होता...त्यामागचं कारण म्हणजे १२.१२.१२ ही तारीख...त्यांच्या रुग्णालयात १२ टेस्टट्यूब बेबींना जन्म देण्याची तयारी करण्यात आलीहोती..लग्नाला १२ वर्ष उलटून गेल्यावरही मुल न झाल्यामुळे कामाक्षी आणि अश्विन या दाम्पत्याने आयव्हीएफच्या माध्यमातून टेस्टट्यूब बेबीचा मार्ग स्विकारलाय....विशेष म्हणजे १२.१२.१२ या तारेखेलाच त्यांच्या बाळाचा जन्म होणार असल्यामुळे त्यांना आकाश ठेंगणं झालं होतं....

या दाम्पत्याप्रमाणेच जयश्रीसाठी १२ तारख फार महत्वाची आहे..तिने खरंतर कोणताच प्लॅन केला नाही पण १२.१२.१२ला जुळ्या मुलांना जन्म देणार असल्यामुळं तिच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे..

सगळं काही सुरळीत पार पडलं तर १२ ही तारीख डॉ.पूर्णिमा यांच्यासाठी कायमची लक्षात रहावी अशीच ठरणार आहे..कारण इथं वेगळाच इतिहास घडणार आहे. त्यांच्या रुग्णालयात सगळी तयारी झालीय..नवजात मुलांसाठी नवे कपडेही तयार आहेत. ऑपरेशनची तयारी झालीय. केवळ त्या घटकेची सगळी वाट पहात आहेत. 12.12.12 ही तारीख लग्नासाठी उत्सुक असल्यांसाठी तर जणू पर्वणीच ठरली...अनेकांनी बोहल्यावर चढण्यासाठी हाच मुहूर्त साधला...

१२.१२.१२ या तारखेनं सगळ्या जगाला भूरळ घातलीय. त्यामुळेच ही तारखे आयुष्यभर लक्षात रहावी असं काही तरी करण्याचा मानस अनेकांनी आखला.त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीच त्याचं नियोजन केलं होतं.१२.१२.१२ या तारखेला लग्न करणा-यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. ठाणेकरांनाही या तारखेनं चांगलीच मोहिनी घातलीय. ठाण्यातल्या उपनिबंधक कार्यालयाबाहेर बुधवारी सकाळपासूनच गर्दी होती. खरंतर लग्नासाठी ही गर्दी होती. १२.१२.१२ हा मुहूर्त त्यांना साधायचा होता.१२.१२.१२ या तारखेला ठाण्यात ३० जोडपी विवाह बंधनात अडकली. आपल्या लग्नाची तारीख कायमची लक्षात रहावी यासाठीच अनेकांनी ही तारीख निवडली होती.

ज्योतिषांनी १२.१२.१२ हा दिवस शुभ नसल्याचा दावा केला असला तरी १२.१२.१२ची क्रेझ काही कमी झाली नाही... मुंबईपासून दिल्लीपर्यंत हेच चित्र पहायला मिळालंय..दिल्लीत राहणा-या चारुचा दोन महिन्यापूर्वी विवाह निश्चित झाला...आणि तिने १२.१२.१२ या तारखेला लग्नासाठी पतीकडं हट्ट धरला...

१२.१२.१२ या तारखेला विवाह निश्चित झाल्यामुळे चारुच्या कुटुंबाला मोठा आनंद झाला होता..विवाहाशी संबंधीत व्यावसायकिंना या तारखेचा बराच फायदा झाला आहे..१२.१२.१२ या तारखेसाठी त्यांच्याकडं दोन महिन्यापूर्वीच बुकिंग झालं होतं..

कुणी अंकशास्त्रानुसार तर कुणी अंकाच्या आकर्षणातून १२.१२.१२ ही तारीख निवडलीय...पण काही जरी असलं तरी या तारखेमुळे नागरिकांमध्ये उत्साह मात्र दिसून आला.

आपल्या बाळाला ठरावीक तारखेला जन्म देण्याचा अट्टहासही काहींनी पूर्ण केला...त्यासाठी त्यानी १२.१२.१२ ही तारीख आणि वेळही निव़डली होती. 12.12.12 चा शतकातील हा मुहूर्त अनेकांनी आपआपल्या पद्धतीने साधण्याचा प्रयत्न केलाय..नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या एका नायजेरीयन दाम्पत्याने आपल्या बाळाच्या जन्मासाठी हाच दिवस निवडला होता...12.12.12 या तारखेला दुपारी बारा बाजून बारा मिनिटांनी बाळाला जन्म दिला..त्यासाठी त्यांनी सिझरिनचा मार्ग अवलंबला. केवीन दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाचं नाव हार्मनी असं ठेवलंय....१२.१२.१२ या तारखेसाठी केवीन दाम्पत्याने खास आग्रह धरला होता..याच दिवशी आणि याच वेळी आपल्या बाळाचा जन्म व्हावा असा त्यांचा अट्टाहास होता आणि तो त्यांनी पूर्ण केला...

केवीन दाम्पत्याप्रमाणेच दिल्लीचे राहिवासी असलेले रवि आणि आशा हे ठकराल दाम्पत्य चार वर्षानंतर पहिल्यांदा मातापिता होणार होते...पण त्यासाठी त्यांनी १२.१२.१२ ही तारीख निवडली होती..खरं तर आशा यांची डिलेव्हरी १० डिसेंबरला होणार होती..परंतू १२.१२.१२साठी त्यांनी डिलेव्हरी दोन दिवसांसाठी टाळली. १२.१२.१२ या अनोख्या तारखेची भूरळ जगभरातील लाखो जोडप्यांना पडली आहे..त्यामुळेच काहींनी सिझरीनचा मार्ग अवलंबला आहे..

विशिष्ट तारीख आणि वेळेसाठी सिझेरियन करणं योग्य नसल्याचं डॉक्टरांच म्हणनं आहे..पण अंकशास्त्रांच्या अभ्यासकानुसार १२.१२.१२ योग या महुर्तावर जन्माला येणा-या बालकासाठी भाग्यशाली असणार आहे..त्यामुळेच अनेक मातापित्यांनी अंकशास्त्राला महत्व दिलं..खरंतर विज्ञानाच्या दृष्टीने या तारखेला आणि मुहुर्ताला कोणतच महत्व नाही..पण लोकांच्या उत्साहाला सीमा नसते आणि हौशेला मोलही नसतं...हेच या सगळ्या घटनांवरुन दिसून येईल..

First Published: Wednesday, December 12, 2012, 23:19


comments powered by Disqus