Exclusive- पाहा विधानपरिषदेचा निकाल - Marathi News 24taas.com

Exclusive- पाहा विधानपरिषदेचा निकाल


 
 

निकाल विधानपरिषदेचा


 
नाशकात आघाडीला धक्का, हिरे विजयी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत अहमदनगरमधील दोन प्रबळ उमेदवारांमध्ये झालेल्या मत विभागणीचा लाभ घेत नाशिकच्या अपक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी  विजय मिळविला. डॉ. हिरे यांनी आघाडीला दे धक्का दिला.
 
------------------------
 
 
डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा

डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा
कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी मोठ्या फरकांनी भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर यांना पराभूत केले. युतीची गेल्या वीस वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढली आहे.


 
 
-------------------------
 
राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी

राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी 4200 मतांची आघाडी घेतली आहे. सुरूवातीला आघाडी घेणारे भाजपचे संजय केळकर पिछाडीवर गेलेत.


 
 
-------------------------
 
 
सेनेला यश… दीपक सावंत दुसऱ्यांदा विजयी

सेनेला यश… दीपक सावंत दुसऱ्यांदा विजयी
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत विजयी झाले आहेत. दीपक सावंत यांनी सुरेंद्र श्रीवास्तव यांचा पराभव केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत विजयी झाले.


 
-------------------------
 
सेनेला दे ‘धक्का’, कपिल पाटीलांचा विजय झाला ‘पक्का’

सेनेला दे ‘धक्का’, कपिल पाटीलांचा विजय झाला ‘पक्का’
विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे. कपिल पाटील यांचा मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विजय झाला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनिषा कायंदेचा त्यांनी पराभव केला आहे.


 
-------------------------
 

मतमोजणी सुरू, डावखरेंच्या मुलाचं काय होणार?मतमोजणी सुरू, डावखरेंच्या मुलाचं काय होणार?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.-------------------------
 
विधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?

विधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे..


------------------------

First Published: Friday, July 06, 2012, 16:34


comments powered by Disqus