अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच....., love sex dhoka blog wrritten by Sanntosh Taakale

अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....

अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....
संतोष टाकळे
(मॅनेजर - कॉर्पोरेट कम्युनिकेशन)


कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती. तिला मानसिक आधाराची गरज तर होतीच शिवाय तिला एका चांगल्या डॉक्टर कडे न्यायला हवं होत. मी एकाच दिवसाची रजा घेवून आलो होतो. त्यातही पुण्यात मला हल्ली जास्त वेळ राहवत नाही . काय दिवस होते ते मी निरीजा , किरण , अविनाश , प्रिया आणि सोमेश आमचा मास मिडियाचा ग्रुप रोज नवे प्लान्स आज काय पार्वतीला जावूया एकाद्या रविवारी सिंहगड ठरलेला आणि मुक्काम मात्र निरीजाच्या निसर्ग बंगल्यावर कॉलेजच्या प्रत्येक फेस्टिवल मध्ये आमचा ग्रुप अव्वल ... दिवस उलटत होते आणि आमच्यातला जिव्हाळा अधिक घट्ट होत होता. मास मिडिया अगदी नसानसात भिनलेला. आमच्या निसर्गच्या ओपेन टेरेसवर चालेले वाद -विवाद तात्त्विक आणि शाब्दिक चकमकीत उफाळून येत. निरीजाच्या याच बंगल्यात मी , अविनाश आणि सोमेश पेयिंग गेस्ट म्हणून राहत असू त्याकाळात फक्त ७०० रुपयात मिळालेली हि प्रशस्थ जागा एक मोठा हॉल, छोटंसं किचन अभ्यासाची खोली त्याला लागून एक निवांत ग्यालरी मी बरीच पुस्तकं इथ बसून वाचलीत अगदी तासान तास, निसर्ग बंगल्यातल हे सर्वात श्रीमंत ठिकाण इथं विचारांची निर्मिती झाली, प्रेमाच्या नव्या कोवळ्या पालवीला जोम आला आणि इथंच काही बिनसलं तर दोन पेग म्हणता म्हणता १ खंबा रिकामा झाला.

अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....

निरीजा आणि किरणच जमलं ते याच ग्यालरीत तिला चक्क मिठी मारून त्याने किस केल्याच आम्ही या डोळ्यांनी पाहिलं आणि दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके गाणं सर दिशि ओठांवर रेंगाळून गेलं. निरीजा कोकणस्थ ब्राम्हण आणि किरण साताऱ्याच्या निंबाळकर घराण्याचा युवराज कसं जमेल हे सगळं कुणास ठावूक निरीजाच्या वतीने मीच घरी बोललो कुलकर्णी काका तेंव्हा फार समंजस पणे वागले आणि मग युवराजच्या म्हणजे किरणच्या घरी कळवाव म्हणून मी किरण आणि कुलकर्णी काका साताऱ्याच्या दिशेने मार्गस्त झालो. शनिवार होता. रस्ता तसाहि काही मोकळा नव्हता कुलकर्णी काकांची सफारी गाडी वेगात रस्ता कपात होती. मी आणि किरण मागे हळू आजावत काय बोलावं कसं बोलावं कुणी सुरवात करायची याची तयारी करत होतो . काकांच्या चेहऱ्यावर मात्र एक ताण जाणवत होता आणि तो साहजिकच असावा .पहाटेच्या सुमारास आम्ही जयसिंग वाडीला पोहचलो आणि गाडी किरणच्या भल्या मोठ्या वाड्या समोर थांबली. गडी माणसं लगबगीनं आली आमच्या ब्यागा आत गेल्या आणि किरणचे आबा सोफ्यात बसून आमची वाट पाहत बसलेले दिसले किरण आबांना जावून बिलगला आणि आबांनी या पाव्हणं म्हणत रांगडी आवाजात स्वागत केलं माडीवरच्या खोलीत आमची व्यवस्था चोख होती दिमतीला दोन गडी अगदी राजेशाही थाट पण आमचं सगळं लक्ष मूळ विषयाकडे काय होतंय कोण जाणे ....

उफळत्या चहाचे कप सोफ्यात आले. सोबत काही बिस्किट चहा कसा बसा गळ्यात उतरवला आणि मी विषयाला हात घातला माझा वय तेव्हा अगदी २० - २२ नुकताच मिसुरड फुटलेलं हे कालच पोर काय बोलतय म्हणून आबांचा राग अनावर झाला किरणला फैलावर घेत त्यांनी चार शिव्या हासडत हे अजिबात होणार नाही असा निर्णय दिला आल्या पावली परत जा म्हणत ते सोफ्यातून उठले आणि गड्यांना घेवून थेट मळ्याच्या वाटेला लागले किरणची आई डोईवरचा पदर सावरीत म्हणाली कारभारी म्हणतात तो शब्द शेवटचा आम्ही त्यापूढ जात न्हाई .किरण ने मान जी खाली घातली ती आम्ही तिथून निघे पर्यंत काही वर केली नाही .आम्ही हताश पणे पुन्हा पुण्यात आलो. निसर्गच्या गेट पाशी पोहचलो आणि काका म्हणाले लगेच काही बोलू नकोस जेवणं उरकली कि विषय काढू मी चेहरा हसरा केला आणि निरीजाला हाय केलं ती ग्यालरीत रेलून आमची वाट पाहत होती ..

विषय एव्हाना संपला होता आमच्या परीक्षा उरकल्या होत्या. दोन वर्ष ज्या निसर्ग बंगल्यात आम्ही आमच म्हणून वावरलो त्याला निरोप देताना भिंती खायला उठल्या कोण बोलणार होत त्यांच्या सोबत आमचे वाद विवाद , नुकताच सुचलेली ताजी ताजी कथा आणि भावनांच्या गुंत्यात भिजलेल्या कवितेच्या ओळी सारं काही याच निसर्गच्या चार भिंतीत साजरं झालेलं. पण निघण भाग होतं. निरीजा खूप रडली मला मिठी मारून म्हणाली तू खूप केलंस अगदी सख्या भावापेक्षा पण माझं कदाचित हे असच होणारं असेलं .

.... त्या नंतर दोन वर्षांनी निरीजाचा अचानक कॉल आला येत्या ९ तारखेला पुण्यात ये आत्ता काही विचारू नकोस आल्यावर सांगते आणि तिचा फोन ठेवतोय इतक्यात किरणचा कॉल त्यानं सगळं सविस्तर सागितलं मी पण घरचं लग्न म्हणून एक दिवस अगोदर जायचं ठरवलं आणि ६ तारखेच्या संध्याकाळी पुण्यात आमच्या निसर्ग बंगल्यावर पोहचलो घरात लग्नचा उत्साह बंगल्याच्या रोषणाई वरून स्पष्ट दिसत होता. निरीजा तर मला बिलगली तिच्या जुन्या सवईने माझे दोन्ही गाल ओढत म्हणाली जाड्या शेवटी किरण माझा होणार तिच्या डोळ्यात भलतीच चमक होती.मीहि मग त्या उत्साहात स्वतःला हरवून दिलं ...

लग्न उरकलं आणि पुन्हा आम्ही आमच्या व्यापात गुंतलो मध्ये केव्हा पुण्यात जाण होई तेव्हा निसर्गच्या माझ्या खोलीतला मुक्काम ठरलेला पण लग्नात मी किरणच्या बाजूने उभा राहिलो त्याच्या घरचं कुणीच नव्हतं आणि त्याला असं एकट मला पहावलं नाही. आणि त्या दिवसापासून मला निरीजा मला अहो अहो जावो करत थोरल्या दीराचा मान देते. मलाही सवय झाली होती. वाहिनी वाहिनी करायची मी नुसतं पुण्यात येणार म्हटलं तरीहि मंडईतल्या चार सहा भाज्या ताटात गर्दी करायच्या तिचा आपलेपणा भारावून टाकणारा होता ......

पण मागच्या महिन्यात निरीजा मुंबई मध्ये आली होती पार्ल्यात तिच्या मावशीकडे मी तिला भेटायला गेलो होतो .. पार तरुण वयात वार्धक्य कसं असतं ते हिला पाहून कुणी समजून घ्यावं माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तिला जवळ घेवून मी काही काळ गदगदून रडलो माझी निरीजा आज वाळलेल्या फुला सारखी निस्तेज झाली होती. तिला आत्ता फक्त मोकळीक हवी होती किरणच्या बंधनातून ज्याने जीवापाड प्रेम केलं, त्यानेच दिलेल्या वेदना कशा व्यक्त कराव्या त्याच्या मित्रांनी मिळून केलेला बलात्कार नुसते अंगाचे नाही तर नैतिकतेचे लचके तोडणारे होता . वासनेचा खविस खेळ तिने स्वतः अनुभवला होता. रोज नवी सोबत रोज जबरदस्ती , लाज लज्जा आणि स्वतःचा आत्मसन्मान कधीच पार विरगळून गेलेला. हल्ली तो नव्या बाई सोबत फिरतो , मोठ्या कंपनीची मालकीण आहे. नवऱ्याला सोडून असे हिरो फिरवते अशी तिची ओळख पण किरणला त्याचं काय तिच्या अलिशान गाडीत त्या मध्यम वयाच्या बाईला मिठीत ओढताना त्याला जराही त्याची नैतिकता थांबवत नसेल, तिच्या बंगल्याच्या स्विमिंग पूल मध्ये प्रणय करतांना त्याला आपण किती खोल पाण्यात बुडतोय याचा विचार येत नसेल ..

निरीजा कोसळली होती कॉफीचे रिकामे कप उचलत बडीशेपच्या वाटीत वेटर बिल कोंबून घेवून आला . आणि मी पुन्हा भानावर आलो पैसे देवुन आम्ही बाहेर पडलो नीरजाच्या पाठीवर हातने थोपटून मी काय ते निशब्द पणे व्यक्त केलं आणि तिचा निरोप घेतला. गाडीच्या काचा वर केल्या ड्रायवर ने विचारलं साहेब गाडी निर्सर्ग वर घेवू कि ..... मी मुंबई म्हटलं आणि मुंबई -पुणे एक्प्रेस वे वर गाडीने वेग घेतला रस्ता चुकला कि जसं मन कावरं बावरं होतं तसं काहीसं होत होतं इतक्या मोठ्या रस्त्यावर एकट्याने चलणं किती भयानक असतं अंधारलेल्या रात्री पायवाट चुकली की रस्ता कसा खायला उठतो हे अनुभवत होतो तेही एकट्याने ..............

(नोंद - मुक्त विचारांचं असं ब्लॉगर्स पार्क असल्याने यातं ब्लॉग लिहताना अनेक मतं व्यक्त होतं असतात. त्यामुळे या ब्लॉगमधील मतांशी `झी २४ तास` सहमत असेलच असे नाही. याची वाचकांनी नोंद घ्यावी)

First Published: Tuesday, April 23, 2013, 17:00


comments powered by Disqus