दिवसभराचा उत्साह कसा टिकवाल?

रात्री लवकर झापोवे आणि सकाळी लवकर उठावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. आपले दीर्घआयुष्य होते. सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर ती चांगली. सकाळी लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर उत्साहीत राहतो. त्यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहतो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2013, 11:39 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
रात्री लवकर झापोवे आणि सकाळी लवकर उठावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. आपले दीर्घआयुष्य होते. सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर ती चांगली. सकाळी लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर उत्साहीत राहतो. त्यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहतो.
नेहमी झोपण्याची एकच वेळ असली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते ज्या वेळी शरीर अधिक थकल्यासारखे वाटते, तेव्हाच झोपले पाहिजे. तसेच सकाळी उठण्याची देखील निश्चित वेळ असली पहिजे. त्यामुळे आपल्याला चांगली सवय लागते शिवाय निश्चित वेळेमुळे आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी उठण्याचे अनेक चांगले फायदे आहेत.
झोप व्यवस्थीत घेण्यासाठी सर्वप्रथम झोपेत अडथळा निर्माण करणारी कारणे समजून घेणे गरजेचे आहे. अनियमित जीवनशैलीमुळे लोक नेहमीच आवश्यक गोष्टींकडे कानाडोळा करतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे वेळेवर झोपले पाहिजे.
तुम्ही काम करताना डेस्कवर किंवा टीव्ही पाहताना सोफ्यावरच डुलकी घेत असाल तर ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दिवसा डुलकी घेतली पाहिजे; परंतु अशा पद्धतीने डुलकी घेऊ नये. यापासून बचाव करण्यासाठी चालले पाहिजे. किंवा एखाद्यासोबत फोनवर बोलले पाहिजे.

रात्रीच्या पुरेशा झोपेवरच पुढच्या दिवसाची ऊर्जापातळी अवलंबून असते. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नये. अपुरी झोप आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हानीकारक असते. दिवसा डुलकी घेणे चांगले आहे; परंतु अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त काळ कदापी झोपू नये. कारण, यामुळे रात्रीची झोप खराब होऊ शकते.
दिवसा झोप येत असेल तर प्रकाशाच्या संपर्कात यावे. यामुळे झोप येणार नाही. कारण, अंधार झाल्यावरच मेलाटोनिन हार्मोन सक्रिय होतो. चांगल्या झोपेसाठी रात्रीच्या वेळी जड आणि अधिक मसालेदार जेवण घेऊ नये. तसेच रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपणेदेखील योग्य नाही. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि झोपमोड होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे झोपेचे एकट टाईमटेबल असावे.