Zeenews logo
English   
Saturday, May 25, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

"मला वाचवा हो वाचवा"- सईद

www.24taas.com, लाहोर
 
पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कुठलीही प्रतिकूल कारवाई करू नये, अशी लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिझ सईद याने लाहोर कोर्टाकडे मागणी केली आहे. आपलं जीवन आता सुरक्षित नसून आपल्यासोबत कधीही काहीही होऊ शकतं, तेव्हा आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही सईदने केली आहे.
 
सईदच्या याचिकेवर लाहेर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश अजमत सईद शेख यांनी पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाला आणि पंजाबच्या गृहमंत्रालयाला नोटिस पाठवली आहे आणि २५ एप्रिलपर्यंत उत्तर मागवलं आहे. जमात-उद-दावाच्या सईदने हाफिज-अब्दूर-रेहमान मक्की याच्याद्वारे याचिका पाठवली आहे.
 
अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुध्दच्या लढ्याला आणि सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.
 
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदाचा प्रचंड दबाव असताना सईद आणि त्याचे साथीदार पाकिस्तानात मोकाट फिरत होते. पाकिस्तान सरकारने सईद आणि त्याच्या साथीदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला वेळोवेळी सबळ पुरावे देऊन देखील पाकिस्तानने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत सईदने अनेक वेळा पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबादमध्ये अनेक सभा घेतल्या. आता अमेरिकन सरकारने तालिबान प्रमुख मुल्लाह ओमरला पकडण्यासाठी जेवढं इनाम जाहीर केलं होतं तेव्हढचं सईदला पकडण्यासाठीही देऊ केलं आहे यावरुन प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यावं.
 

First Published: Thursday, April 19, 2012, 00:09

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: