चला घर खाली करा...

मुंबई महापालिकेन धोकादायक टेंकडयाखाली राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा दिल्या आहेत.पावसाआधी घर खाली करण्याच्या नोटीसा पालिकेन जारी केल्या तरी रहिवाशी घर खाली करण्यास तयार नाही आहेत.

Updated: May 22, 2012, 09:58 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेन धोकादायक टेंकडयाखाली राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा दिल्या आहेत.पावसाआधी घर खाली करण्याच्या नोटीसा पालिकेन जारी केल्या तरी रहिवाशी घर खाली करण्यास तयार नाही आहेत. पालिकेन या नोटीसा देण्याएवजी धोकादायक टेंकडयाना संरक्षणभिंत उभी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 

पावसाळ्यातल्या दुर्घटनांमध्ये दहा वर्षात २०० मुंबईकरांचा बळी गेला आहे. या दुर्घटनांमध्ये १७५ जण दरडीखाली दबून मृत झाले आहेत. पावसाळा तोंडावर असल्यानं महापालिकेनं टेकडी आणि टेकडीखाली राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा दिल्या आहेत.  भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली या भागांमधल्या रहिवाश्यांचा यामध्ये समावेश आहे. महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतरही इथले रहिवासी घर रिकामं करायला तयार नाहीत.

 

पालिकेनं नोटीसा देण्याएवजी धोकादायक टेंकड्यांभोवती संरक्षण भिंत उभारावी, अशी रहिवाश्यांची मागणी आहे. या भागात संरक्षण भिंत बांधायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. सत्तेत घडणाऱ्या दुर्घटनांनंतरही पालिका आणि जिल्हाधिकारी संरक्षण भिंत बांधत नाहीयत. पालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या वादात या भागातल्या रहिवाशांना मात्र जीव मुठीत धरुन रहावं लागतंय.