पुन्हा झाली मुंबईची रेकी!

बक-यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एम एस व्ही युसुफी जहाजाचं गूढ अजूनही कायम आहे. समुद्रात जप्त केलेल्या या जहाजावरील कर्मचा-यांनी वापरलेले सॅटेलाईट फ़ोन अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 25, 2013, 08:09 PM IST

www.24taas.com, अजित मांढरे झी मीडिया मुंबई...
बक-यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एम एस व्ही युसुफी जहाजाचं गूढ अजूनही कायम आहे. समुद्रात जप्त केलेल्या या जहाजावरील कर्मचा-यांनी वापरलेले सॅटेलाईट फ़ोन अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे हे जहाज मुंबईच्या किना-यांची रेकी करण्यासाठी आलं होतं काय, अशी शंका उपस्थित झालीये.
तारीख 3 एप्रिल 2013…..वेळ रात्री 11वा. मुंबईच्या कुलाबा परिसरातील एनटीआर केंद्राच्या अधिका-यांचं लक्ष एका सॅटेलाईट मोबाईल फोनवरील संभाषणाने वेधून घेतलं... फिक्र मत करो आपका माल आप तक पहुंच जाएगा.
मुंबईपासून अवघ्या १२ नॉटीकल अंतरावर असलेल्या जहाजातून ती व्यक्ती सॅटेलाईट मोबाईल फोनवरुन बोलतं होती...त्यामुळे एनटीआर अधिका-यांचा संशय बळावला...एनटीआर तो फोन कॉल ट्रेस केला होता...त्यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या नौदलाच्या पथकाला सतर्क केलं....नौदलाच्या पथकाने वेगाने कारवाई करत एमएसव्ही युसुफी या जहाजावरील चौघांना ताब्यात घेतलं...त्यांना जहाजावर ३० बक-या आढळून आल्या तसेच जहाजावर असलेल्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर केल्याचं पोलिसांनी सांगितलंय...
नेवीची गस्त नौका एमएसवी युसुफी या जहाजाजवळ येईपर्यंत जहाजावरील ४ लोकांनी सॅटेलाईट फ़ोन, मेलेल्या बकर्या आणि बरच काही समुद्रात फेकलं, या बरच काही मध्ये काय होतं हे नेवीच्या अधिकार्या्नी कळू शकलं नाहीए, त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलय.

एमएसव्ही जहाजावरील ते चौघे सॅटेलाईट फोनवरुन कोणाच्या संपर्कात होते?त्यांनी सॅटेलाईट फोन का वापरला ? त्यांनी या बक-या दुबईवरुन आणल्या होत्या....दुबईहून बक-या आणण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत...कारण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर केला होता...यापार्श्वभूमीवर मुंबईतील सागरी सुरक्षेचा अंदाज घेण्यासाठी तर ही रेकी केली गेली नाही ना ?की हा तस्करीचा प्रकार होता ? याचा अजून उलगडा झाला नाही...कारण जहाजावरील बक-यांच्या पोटात प्लॅस्टिक पिशवी आढळून आली आहे... त्या पिशवीत काळसर पदार्थ आढळून आला असून त्यामुळे या प्रकरणाचं गुढ आणखीणच वाढलंय..