काटजू! नाक खुपसू नका- शिवसेनाShiv Sena on Katju

काटजू! नाक खुपसू नका- शिवसेना

काटजू! नाक खुपसू नका- शिवसेना
www.24taas.com, मुंबई

काटजूंनी नको त्या विषयात नाक खुपसू नये. खुपसल्यास महाराष्ट्र काय आहे ते त्यांना दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.

अनेक राज्यांच्या राज्यकर्त्यांच्या नामर्दानगीमुळे राज्यं मागसलेली राहिली. त्यामुळे तेथील जनतेला मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या महानगरात काम मिळवण्यासाठी यावं लागतं. हे लोंढे शहरं बकाल करतात. काटजूंना अजूनही आपण सर्वोच्च न्यायालय़ाच्या सिंहासनावर बसल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे अशी वक्तव्यं काटजू करत आहेत, असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसंही परप्रांतीयच आहेत. तेथील भिल्ल तेवढे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे हाकलायची वेळ आल्यास मराठी माणसांनाही महाराष्ट्रातून हाकलून द्यावं लागेल, असं काटजूंचं म्हणणं आहे. त्यामुळे भूमिपुत्र ही संकल्पना राष्ट्रद्रोही असून या मुद्यांचं राजकारण करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, असं काटजूंनी म्हटलं होतं.

First Published: Monday, April 01, 2013, 19:15


comments powered by Disqus