‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?, vasant dhoble again in mumbai?

‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?

‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?
www.24taas.com, मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे बदलीला सामोरं जावं लागलेले पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर घेण्याची मागणी मनसेनं केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर सुनिल प्रभू यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवलंय.

या पत्रात मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलेल्या मागणीनुसार उचित कारवाई करण्याची सूचना महापौरांनी केलीय. उद्धव यांच्या मुलाखतीनंतर मनसे आणि शिवसेनेचे संबंध सुधारण्याबाबत चर्चा सुरू असतानाच महापौरांनी इतकी तत्परता दाखवल्यानं या चर्चेला बळकटी मिळालीय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेनंही ढोबळेंच्या बदलीला विरोध करताना वाकोल्यात सह्यांची मोहीम राबवली होती. यावेळी जवळपास सहा हजार लोकांनी सह्याकरून ढोबळे याची बदली रद्द करण्याची मागणी केली होती.

First Published: Thursday, January 31, 2013, 08:54


comments powered by Disqus