कलमाडींना हायकमांडचा लगाम - Marathi News 24taas.com

कलमाडींना हायकमांडचा लगाम

www.24taas.com,  पुणे 
 
कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी नऊ महिने तिहारमध्ये मुक्काम ठोकलेल्या सुरेश कलमाडींच्या पुणे आगमनात मोठा अडथळा निर्माण झालाय. काँग्रेसच्या हायमकमांडनं कलमाडींना पुणे जाण्यास परवानगी नाकारलीय.
 
सुरेश कलमाडींच्या बोलण्यावरही काँग्रेसकडून निर्बंध घालण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळं पुणे महापालिका निवडणुकीतल्या कलमाडींच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून कलमाडी समर्थकही नाराज झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात कलमाडींची सुटका झाल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
 
कलमाडी पुणे प्रचारात सहभागी झाले तर काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयतं कोलित मिळणार या भीतीनं पक्षानं कलमाडींना निवडणुकांच्या प्रचारापासून चार हात लांब ठेवण्याची खेळी खेळल्याचं चित्र दिसतंय. काल पुण्यात कलमाडी समर्थकांकडून बसकांडातील जखमींना कलमाडी भेटणार असल्याची पत्रक वाटण्यात आली होती. त्यामुळं कलमाडींचे आज पुण्यात आगमन होणार होतं. पक्षाकडून त्यांना पुण्यात जाण्यास मनाई करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.
 

 
 
 

First Published: Friday, January 27, 2012, 15:44


comments powered by Disqus