संजयच्या शूटचा शेवटचा दिवस... Last shoot of Sanjay Dutt

संजयच्या शूटचा शेवटचा दिवस...

संजयच्या शूटचा शेवटचा दिवस...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संजय दत्त टाडा कोर्टात शरण आला.. मात्र, दिलेली कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी संजय दत्त शेवटपर्यंत शूट करत होता. कसा होता संजयच्या शूटचा शेवटचा दिवस?

अपूर्व लाखियाच्या ‘जंजीर’ सिनेमाचा शॉट संजय दत्तने 13 मे ला चांदीवली स्टुडिओत दिला. तत्पूर्वी पाली हिल इथल्या घरापासून अंधेरीच्या चांदीवली स्टुडिओपर्यंतचा दोन तासांचा प्रवास संजय दत्तने स्वत: कार ड्राईव्ह करुन केला. खरं म्हणजे, तुरुंगात जायच्या आधीचा दिवस संजूबाबाला आपल्या बायकोमुलांसह घालवायचा होता. मात्र, आपण दिलेली कमिटमेंट पाळण्यासाठी संजय दत्तला शुटच्या ठिकाणी पोहचावचं लागलं. यावेळी सेटवर प्रियांका चोप्रा खास गोव्याहून, रामचरण तेजा नॉर्वेहून आणि श्रीहरी हैदराबादहून आले होते.. सेटवरच वातावरण खूपच भावूक होतं. मात्र, तरीही सगळं काही सुरळीत सुरु असल्याचं प्रत्येकजण दाखवत होता.

नेहमीप्रमाणेच हसणं, खिदळणं, विनोद करणं सुरु होतं. शुटिंगच्या दरम्यान संजूबाबालाही रडू आवरता आलं नाही. यावेळी संजूबालाला गिफ्ट्सही देण्यात आली. मात्र, कुठेतरी प्रत्येकालाच हे ठाऊक होतं की पुढच्या साडेतीन वर्षांसाठी संजय दत्तचा शेवटचा शॉट होता. संजूबाबालाही अश्रू आवरले नाहीत. आणि अखेर संजुबाबा रडला आणि सेटवरुन जाताना देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा असंच सांगून गेला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013, 21:10


comments powered by Disqus