बाबा-दादा आज आमनेसामने

पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात स्वतः मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिलीच जाहीर सभा पिंपरीत होते आहे.

Updated: Feb 13, 2012, 02:27 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात स्वतः मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिलीच जाहीर सभा पिंपरीत होते आहे.

शहरात मुळातच कमकुवत असलेल्या काँग्रेसला बळ देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री रणमैदानात उतरले आहेत. आता ते अजित पवारांचा समाचार कसा घेणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. दुसरीकडे अजित पवारांच्याही पिंपरीत चार सभा होत आहेत. गेले काही दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातलं सही नाट्य चांगलंच रंगलं होतं.

अर्थखातं आपल्याच ताब्यात असल्यानं कुणाला किती निधी द्यायचा, ते मी ठरवतो असं सांगत अजित पवारांनी हल्लाबोल केला, तर मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावलं होतं. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधला आजचा दिग्गजांचा सामना चांगलाच रंगतदार होणार आहे.