आंद्रे आगासी पहिल्यांदाच होतोय भारतात दाखल

टेनिसपटू आंद्रे आगासी आज पहिल्यांदाच भारतात येतोय. पण, ही भेटदेखील अगदी छोटीशी आणि खाजगी असणार आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय चाहत्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2012, 11:03 AM IST

www.24taaas.com, मुंबई
टेनिसपटू आंद्रे आगासी आज पहिल्यांदाच भारतात येतोय. पण, ही भेटदेखील अगदी छोटीशी आणि खाजगी असणार आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय चाहत्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
काही खाजगी समारंभात सहभागी होण्यासाठी आंद्रे आगासीनं हा त्याचा पहिला-वहिला भारतदौरा आयोजित केलाय. मंगळवारी मुंबईत दाखल होणारा आगासी लगेचच म्हणजे गुरुवारी १३ डिसेंबरला परत जाणार आहे. खाजगी दौरा असला तरी यावेळी त्याची पत्नी स्टेफी ग्राप ही त्याच्यासोबत नसेल. पण, त्याचा खाजगी व्यवस्थापन लवाजमा मात्र संपूर्ण दौऱ्यात त्याची सोबत करणार आहे..
तब्बल एक दशक जागतिक टेनिसवर अधिराज्य गाजविणारा अमेरिकेचा आंद्रे १९९० आणि २००० च्या शतकात आघाडीवर होता. आठ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या आंद्रे आगासीनं २००६ साली मात्र टेनिस जगताला रामराम ठोकला होता.