महाराष्ट्राचा निम्मा संघ `भारत श्री` च्या अंतिम फेरीत

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीनं बालेवाडीत सातव्या `भारत श्री` स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे.

Updated: Mar 25, 2014, 11:42 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, पुणे
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीनं बालेवाडीत सातव्या `भारत श्री` स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे.
पुण्यात सुरु असलेल्या सातव्या `भारत श्री` स्पर्धेत महाराष्ट्राचा निम्मा संघ अंतिम फेरीसाठी पात्र झालाय.

या स्पर्धेच्या एकूण 50 लाखांहून अधिक बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत तब्बल 30 राज्यांचे 450 हून अधिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
प्रथम विजेत्याला 4 तर उपविजेत्याला 2 लाखांची रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.

महाराष्ट्राचे खेळाडूं अंतिम फेरीत पाच ते सहा पदकं जिंकू शकतात असं मत इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे महासचिव चेतन पाठारे यांनी व्यक्त केलं आहे.

त्यामुळं आता भारत श्रीचा मान महाराष्ट्राच्या खेळाडूला मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून मोठ्या आशा आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.