ज्वालाच्या `बंड`मिंटन विरोधात आजीवन बंदीची शिफारस

भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टावर आजीवन बंदीची कारावाई होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशननं ज्वालावर आजीवन बंदीची कारवाई करावी अशी शिफारस केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 6, 2013, 09:09 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टावर आजीवन बंदीची कारावाई होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशननं ज्वालावर आजीवन बंदीची कारवाई करावी अशी शिफारस केली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने ज्वालाला काही काळासाठी निलंबित केलं जावं, किंवा तिच्यावर आजीवन बंदी घालावी अशी शिफारस केली आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. ज्वालाने बिनशर्त माफी मागितली, तर तिला शिक्षा होण्याची शक्यता नाही. याविषयीचा अंतिम निर्णय भारतीय बॅडमिनंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांच्या हाती असेल अशीही माहिती पीटीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
२५ ऑगस्टला झालेल्या सामन्यात बांगा बीट्सचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघात ऐनवेळी बदल करण्यात आले. आधी संघात नसलेल्या डेन्मार्कच्या जान जोर्गेन्सनला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीच्या संघाने बंड करण्याची तयारी केली. ज्वालाला त्यासाठी नोटीसही बजावण्यात आली.
आयबीएल अर्थातच इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये बेस प्राईसपेक्षा कमी किंमत दिल्यामुळे ज्वालानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयकॉन प्लेअर असूनही तिला बेस प्राईसपेक्षा अर्ध्या किंमतीत दिल्ली सॅमशर्सकडून खेरदी करण्यात आलं होतं. यानंतरही ज्वाला भडकली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.