बांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई

बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल  एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

Updated: Mar 20, 2015, 02:33 PM IST
बांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई title=

मेलबर्न : बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल  एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

बांग्लादेशने निर्धारित वेळेत दोन ओव्हर्स कमी केल्या होत्या. धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल कारवाई होण्याची मुर्तजाची गेल्या १२ महीन्यातील दुसरी वेळ आहे. टीममधील इतर खेळाडूंवरही २० टक्के दंड लावण्यात आला आहे. 

याआधी ९ मार्चला इंग्लंड विरूद्धच्या सामन्यातही धीम्या गतीने ओव्हर केल्याबद्दल मुर्तजा दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मुर्तजाने त्याच्यावरील आरोप आणि कारवाई मान्य केली आहे त्यामुळे यावर सुनावणीची गरज नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.