महिला क्रिकेटर्सचा लैंगिक छळ; `पीसीबी' हादरलं

पाकिस्तानच्या मुल्तान क्षेत्रातल्या काही महिला क्रिकेटर्सनं आपल्या वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळ आणि दुर्व्यवहारचा आरोप केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2013, 12:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कराची
पाकिस्तानच्या मुल्तान क्षेत्रातल्या काही महिला क्रिकेटर्सनं आपल्या वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळ आणि दुर्व्यवहारचा आरोप केलाय. मुल्तान क्षेत्रातल्या पाच महिला खेळाडूंनी सोमवारी टीव्ही चॅनलवरच जाहीररित्या ही तक्रार केल्यानं एकच खळबळ उडालीय.
टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून ही बाब उघड झाल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूक केलीय.

हिना गाफूर, किरण खान, सीमा जावेद, नूर फातिमा आणि मलिहा शफीक या महिला क्रिकेटर्सनं ही तक्रार केलीय. या क्रिकेटर्सच्या म्हणण्यानुसार, कोचसहित काही अधिकाऱ्यांनी संघात समावेश करण्यासाठी त्यांच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केली होती. एमसीसी अध्यक्ष बेगम शमी सुल्तान आणि इतर क्लब अधिकारी हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून खेळाडूंकडून ते पैशाचीदेखील मागणी करत होते, अशी तक्रार या खेळाडूंनी केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.