पेस, तेंडुलकर आणि आनंद... एक धागा!

लिअँडर पेसनं वयाच्या ४० वर्षी अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. वयाची ४० गाठूनही त्यानं जिद्द असल्यावर आपण अशक्यप्राय गोष्ट शक्य करु शकतो हेच दाखवून दिलं. पेस प्रमाणेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंद यांनीही हेच दाखवून दिलं आहे. पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 14, 2013, 05:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लिअँडर पेसनं वयाच्या ४० वर्षी अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. वयाची ४० गाठूनही त्यानं जिद्द असल्यावर आपण अशक्यप्राय गोष्ट शक्य करु शकतो हेच दाखवून दिलं. पेस प्रमाणेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंद यांनीही हेच दाखवून दिलं आहे. पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट...
न्यूयॉर्कच्या आर्थर ऍश स्टेडियमवर भारताच्या लिअँडर पेसनं चेक रिपब्लिकच्या राडेक स्टेपनेकसह अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला. वयाच्या ४० व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकणारा पेस सर्वात ओल्डेस्ट टेनिसपटू ठरला. आपल्या असामान्य कामगिरीनं त्यानं करिअरमधील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी वय हा फॅक्टर असू शकत नाही याची प्रचिती आणून दिली. १९९० मध्ये ज्युनियर विम्बल्डन जिंकणारा पेसनं वयाच्या २२ व्या वर्षी डेव्हिस कपची मॅच खेळली होती. तर १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकममध्ये गोल्ड मेडल पटकावत त्यानं अवघ्या क्रीडा जगताचं लक्ष वेधीन घेतलं होतं. यानंतर त्यानं आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नव्हतं. ब्रेन ट्युमर, वैयक्तिक आयुष्यातील उलथा-पालथ त्याचप्रमाणे टेनिसममध्ये त्याचे पार्टनर्सही सतत बदलत राहिले. या सगळ्यावर मात करत त्यानं आपला खेळ सुरुच ठेवला. त्याच्या विजीगिषू वृत्तीमुळेच टेनिसमध्ये त्यानं विक्रमांवर विक्रम केले. मात्र, गेले १२ ते १८ महिने पेससाठी अतिशय खडतर गेले. २०१२ ऑलिम्पिकच्या सिलेक्शनपासून त्याच्यासाठी काहीच चांगलं घ़डत नव्हतं. मात्र, केवळ जिद्द आणि फिटनेसच्या जोरावर त्यानं अमेरिकन जिंकत आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं.
लिअँडर पेसनं अमेरिकन ओपनच्या डबल्सचं अजिंक्यपद पटकावत आपल्या टेनिस करिअरमधील डबल्सचं आठवं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं. तर पेसच्या टेनिस करिअरमधील हे १४ वं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं.

लिअँडर पेसबरोबर क्रीडा जगतात वयाची चाळीशी पार केलेले आणखी दोन क्रीडापटू भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलानं फडकावतायत. क्रिकेटविश्वाचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर आणि ६४ घरांचा राजा विश्वनाथन आनंद. लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंदनं आपल्या कामगिरीनं क्रीडा विश्वात आपला वेगळा ठसा उमटवलाय. वयाच्या १४ व्या वर्षी विशीनं नॅशनल चेस चॅम्पियनशिप जिंकत आपली वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या १८व्या वर्षी तो इंटरनॅशनल मास्टर झाला होता. ३१ वर्षाच्या आतच तो फिडे वर्ल्ड चॅम्पियन झाला. आपल्या आक्रमक अंदाजानं त्यानं चेसममधील रशियन साम्राज्य खालसा केलं होतं.

विश्वनाथन आनंदच्या नावावर पाच वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेतेपदं आहेत. २०००, २००७, २००८, २०१० आणि २०१२ मध्ये त्यानं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. विश्वनाथन आनंदची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे ती नोव्हेंबरमध्ये. वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसनशी त्याचा चेन्नईमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा मुकाबला रंगणार आहे. आता मुकाबला जिंकत त्याला इतिहास रचण्याची संधी आहे.
आनंदप्रमाणेच क्रिकेट जगतावर सत्ता आहे ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. क्रिकेटमध्ये त्यानं साध्य केलंय त्याचं कौतुक करावं तेवढ थोडं आहे. भारतामध्ये सर्वाधिक दबाव कुठल्या क्रिकेटपटूवर असेल तर तो सचिन तेंडुलकरवर... वयाच्या ४० व्या वर्षी तोही विक्रमांचे इमले रचतोय. त्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय सेंच्य़ुरीज झळकावल्या आहेत. दरम्यान, सचिनला अनेक दुखापतींनीही ग्रासलं होतं. ज्यावेळी त्याला टेनिस एल्बोची दुखापत झाली होती. त्यावेळी सचिन संपला या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, सचिननं वयाप्रमाणे खेळावर येणा-या मर्यादा झुगारुन अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र, गेल्या दोन वर्षात त्याला एकही टेस्ट सेंच्युरी ठोकता आलेली नाही. असं असलं तरी आता तो आपल्या करिअरमधील विक्रमी २०० वी टेस्ट खेळणार आहे. यामध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. सचिन तेंडुलकरनं १९८ टेस्टमध्ये ५३.८६च्या सरासरीनं १५८३७ रन्स केले आहेत. याममध्ये ५१ सेंच्युरीज आणि ६७ हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे.

लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंद यांनी योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य जीवनशैली त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शन असल्यास काहीही साध्य करू शकतो हेच दाखवून दिलं आहे. डोळ्यात स्वप्न, मनात जिद्द, मेहनतीची तयारी आणि पोटात आग असेल तर वयाची बंधनं गळून पडतात. ये दिल मांगे मोअर याचं उत्तम उदाहरण म्हणजेचं हे तिघं.... म्हटल आहे ना लाई