भारताची सिंधू बनली मकाऊ ओपन चॅम्पियन

By Aparna Deshpande | Last Updated: Sunday, December 1, 2013 - 16:50

www.24taas.com, झी मीडिया, मकाऊ
भारताची टॉप सीडेड बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू हिनं मकाऊ ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सिंधूनं कॅनडाच्या लि मिचेलला पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
११व्या सीडेड सिंधूनं ३०व्या सीडेड मिचेलवर २१-१५,२१-१२नं मात करत आपल्या करिअरमधील दुसऱ्या इंटरनॅशनल विजेतेपदाची कमाई केली.
यापूर्वी सिंधूनं मलेशियन ओपनचं विजेतेपद मिळवलं आहे. याशिवाय तिनं यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलची देखील कमाई केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 1, 2013 - 16:50
comments powered by Disqus