कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव

कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

Updated: Jul 25, 2012, 10:38 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

कलमाडींनी ऑलिम्पिक उदघाटनाला उपस्थित राहण्यापेक्षा देशाच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं कोर्टानं म्हंटलंय. त्याचबरोबर कलमांडींना 27 जुलैपर्यंत देशाबाहेर जायलाही कोर्टानं मनाई केलीय.

कलमाडी कॉमनवेल्थ गेम्समधले प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळेच कलमाडींना ऑलिम्पिकला जाण्याची परवानगी मिळू नये, अशा आशयाची याचिका ऍडव्होकेट राहुल मेहरा यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टानं कलमाडींना परवानगी नाकारलीय.