सायनाचा विजय, भारताला दिलासा

ऑलिंपिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सायना नेहवालनं आज विजय संपादन केला. स्वीत्झर्लंडच्या सब्रिनाचा अवघ्या २२ मिनिटांत २१-९, २१-४ असा फडशा पाडून सायनानं आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलं.

Updated: Jul 29, 2012, 11:19 PM IST

www.24taas.com, लंडन

 

ऑलिंपिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सायना नेहवालनं आज विजय संपादन केला. स्वीत्झर्लंडच्या सब्रिनाचा अवघ्या २२ मिनिटांत २१-९, २१-४ असा फडशा पाडून सायनानं आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलं.

वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सायनाचा मुकाबला ६५व्या सीडेड सब्रिनाशी होणार होता. स्वाभाविकच, या सामन्यात तिचं पारडं चांगलंच जड होतं. त्यानुसारच ती धडाकेबाज खेळली आणि सब्रिनाला डोकं वर काढण्याची जराही संधी न देता ' शान से ' जिंकली. बीजिंग ऑलिंपिकमध्ये सायनानं उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पदार्पणातच तिनं केलेली ही कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्यानंतर, गेल्या चार वर्षांत सायनानं अनेक शिखरं सर केल्यानं ऑलिंपिकच्या महासंग्रामात ती भारताचं प्रमुख आशास्थान आहे.

लंडन ऑलिंपिकमधील टेबल टेनिस स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. लंडन ऑलिंपिकसाठी टेबल टेनिसमध्ये भारताचे दोन खेळाडू पात्र ठरले होते. महिला एकेरीत शनिवारी अंकिता दासला पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. मात्र , पुरुष एकेरीत सौम्यजित घोषने विजयी सलामी देऊन भारताचे आव्हान कायम राखले होते. रविवारी मात्र त्याला दुस-या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.