बॉक्‍सर देवेंद्रो सिंगचा विजयी ठोसा

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॉक्सर देवेंद्रोसिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. ४९ किलो वजनी गटात त्यानं विजय मिळवला. देवेंद्रोनं मंगलोलियाच्या सेरदाम्बा पुरेवदोर्जला पराभूत केलं.त्यानं १६-११नं विजय मिळवला.

Updated: Aug 4, 2012, 08:23 PM IST

www.24taas.com, लंडन

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॉक्सर देवेंद्रोसिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. ४९ किलो वजनी गटात त्यानं विजय मिळवला. देवेंद्रोनं  मंगलोलियाच्या सेरदाम्बा पुरेवदोर्जला पराभूत केलं.त्यानं १६-११नं विजय मिळवला.

देवेंद्रो सिंगने मंगोलियाच्‍या खेळाडूस पराभूत करून क्‍वार्टर फायनलमध्‍ये प्रवेश करत पदकाची आशा पल्‍लवीत केली आहे. भारताला आठव्या दिवशी मैदानाबाहेरही एक लढत द्यावी लागणार आहे. तर आज ब्राँझ मेडलकरता झालेल्या मॅचमध्ये भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने चीनच्या सेकंड सीडेड वँग झीनचा पराभव करत मेडलला गवसणी घातली. सायनाच्या या विजयामुळे भारताच्या खात्यात तिस-या ऑलिम्पिक मेडलची नोंद झाली आहे.

शुक्रवारी उशीरा रात्री बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात भारताच्या विकास कृष्ण आणि अमेरिकेचा बॉक्सर एरोल स्पेस यांच्यात झालेल्या लढतीत विकासला विजयी ठरविले होते, नंतर मात्र हा निर्णय बदलण्यात आला आणि विकास हारल्याचे घोषित करण्यात आले. शनिवारी भारताने विकाससाठी अपिल करण्याची घोषणा केली आहे.