ऍथलीटने गमावला पाय, क्रीडा संघटनेला कदर नाय

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.

Updated: Nov 8, 2011, 03:30 PM IST

झी 24 तास वेब टीम, वर्धा

 

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली. पण क्रीडा संघटनांनी याची साधी दखलही घेतली नाही.

 

17 वर्षीय निरज सिंग. ऍथलीट अशी त्याची ओळख आता कदाचीत पुसली जाणार. कारण ट्रेनमधून पडल्यानं निरजला पाय गमवावा लागला. ठाण्याचा रहिवासी निरज, रांचीला पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनशीपहून मुंबईत परतत होता. त्याचवेळी ट्रेनमधून पडून निरजवर पाय गमावण्याची वेळ आली. क्रीडा संघटनेनं या खेळडूंच्या प्रवासाची सोय करणं, एखाद्या अधिकाऱ्याला खेळाडूंसोबत पाठवणं अपेक्षित होतं. पण तेवढं सौजन्य दाखवेल ती क्रीडा संघटना कसली.

 

निरज ट्रेनमधून पडला आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा पाय कापावा लागला. वर्ध्याच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निरजला अजुनही क्रीडा संघटनेतून कुणी भेटायला आलेलं नाही. हे शल्य त्यानं बोलून दाखवलं. राष्ट्रीय़ आणि राज्य पातळीवर अनेक पदक मिळवणाऱ्या निरजला क्रीडा संघटनेच्या हलगर्जीपणाचा फटका बसला.