कुस्तीगीर गीताने इतिहास घडवला

गीताने रविवारी इतिहास घडवला आहे. गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला कुस्तीगीर ठरली. कझाकिस्तान इथल्या आशियाई पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरली आहे.

Updated: Apr 2, 2012, 08:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 
गीताने रविवारी इतिहास घडवला आहे. गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला कुस्तीगीर ठरली. कझाकिस्तान इथल्या आशियाई पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरली आहे. गीताने ५५ किलो वजनी गटात दोन सामने जिंकत अंतिम फेरीत दाखल होत ऑलिंपीकमध्ये आपली जागा निश्चित केली. आशियाई पात्रता स्पर्धेत सूवर्ण आणि रौप्य पदक विजेत्यांना लंडन ऑलिंपीकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ऑलिंपीकमध्ये २००४ साली महिला कुस्ती प्रकार सुरु करण्यात आला होता.