इंग्लडचा कांगारुंना ‘धोबीपछाड’!

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्सवर रंगलेल्या ऍशेज सीरिजच्या दुस-या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 22, 2013, 06:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्सवर रंगलेल्या ऍशेज सीरिजच्या दुस-या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला... इंग्लंडने सेकंड इनिंगमध्ये कांगारूंची इनिंग 235 रन्सवर आटपत... दणदणीत 347 रन्सने विजयाची नोंद केली... आणि सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतली...
ऍशेज सीरिजची पहिली टेस्ट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया किमान दुस-या टेस्टमध्ये कमबॅक करून इंग्लंडला टफ फाईट देईल अशी आशा क्रिकेट प्रेमींना होती... मात्र पहिल्या टेस्टप्रमाणे सेकंड टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाची पाटी कोरिच राहिली... सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 583 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची इनिंग अवघ्या 235 रन्सवरच आटोपली... आणि इंग्लंडने लॉर्ड्स विजयासह सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतली...
ऑस्ट्रेलियाच्या या नामुष्कीजनक पराभवाला कारणीभूत ठरला तो ऑसी बॅट्समन्सचा अवसानघातकी खेळ... पहिल्या इनिंगप्रमाणेच सेकंड इनिंगमध्येही कांगारूंची अडखळती सुरूवात झाली... अवघ्या 36 रन्सवर वॉटसन, रॉजर्स आणि फिलिप ह्युजेस हे आघाडीचे तीन बॅट्समन पॅव्हिलियनमध्ये परतले... त्यानंतर पीचवर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि कॅप्टन मायकल क्लार्क यांनी वैयक्तिक हाफ सेंच्युरी झळकावत... ऑसी इनिंग सांभाळण्याचा अपूरा प्रयत्न केला... या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशिप केल्यानंतर... बॅटिंगमध्ये कमाल करत 180 रन्सची खेळी करणा-या जो रूटने इंग्लंडला क्लार्क आणि ख्वाजाच्या रूपात सलग ब्रेक थ्रू मिळवून दिले.. आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला...
चौथ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या नऊ विकेट्स 192 रन्सवरच पॅव्हिलियनमध्ये परतल्यानंतर... नियमानूसार दिवसाचा खेळ अर्ध्या तासाने वाढवण्यात आला... आणि स्वानने पॅटिनसनचा अडथळा दूर करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं... बॅटिंगसह बॉलिंगमध्येही चोख कामगिरी बजावणा-या जो रूटची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.