‘फिफा` वर्ल्डकप 2014 मध्ये आज...

वर्ल्ड कपमध्ये स्टार स्टडेड मॅच रंगणार आहे ती इंग्लंड आणि इटलीमध्ये… वेन रूनी, स्टिव्हन जेरार्ड, मारियो बालोटेली आणि आंद्रेय पिर्लो हे चार फुटबॉलपटू या मॅचेमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 15, 2014, 02:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वर्ल्ड कपमध्ये स्टार स्टडेड मॅच रंगणार आहे ती इंग्लंड आणि इटलीमध्ये… वेन रूनी, स्टिव्हन जेरार्ड, मारियो बालोटेली आणि आंद्रेय पिर्लो हे चार फुटबॉलपटू या मॅचेमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे. ‘ग्रुप ऑफ डेथ’ असलेल्या ‘ग्रुप डी’ मधील या दोन्ही टीम्समधील मुकाबला फुटबॉल प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
फूटबॉल जगतातील दोन हाय प्रोफाईल टीम्स इंग्लंड आणि इटली वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं फुटबॉलप्रेमींना काँटे का मुकाबला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्समध्ये सुपरस्टार फुटबॉलपटूंचा भरणा आहे. वेन रूनी इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार स्ट्रायकर...
क्वालिफाईंग मॅचमध्ये रूनीची जादू चांगली चालली होती. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रूनी आतूर असेल. इंग्लिश टीमच्या या जबरदस्त फुटबॉलपटूकडून सा-यांनाच अपेक्षा असणार आहेत. आता रूनी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी कऱण्यात यशस्वी होतो का ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे. तर दुसरी इटलीच्या टीमला फुटबॉल विश्वात स्लो-स्टार्टर्स म्हणून ओळखलं जातं. या मॅचमध्ये ते थ्री लायन्स गेम प्लॅननं मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आंद्रेय पिर्लो आणि जेम्स मिलनर आणि ज्युवेन्टस मिडफिल्डची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. याच रणनितीनं ते इंग्लिश टीमला रोखण्यास सज्ज असतील.मारियो बालोटेली या स्टायलिश फुटबॉलरवरही सा-यांचच लक्ष असणार आहे. तर इंग्लंडचे मॅनेजर रॉय हॉजसन आपल्या फुटबॉलपटूंना आक्रमक फुटबॉल खेळण्याचा सल्ला दोतायत. त्यामुळे या मॅचमध्ये आता कुठल्या टीमची रणनिती यशस्वी ठरते याकडेच जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असेल.

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आज होणाऱ्या लढती
भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता - कोलम्बिया X ग्रीस
भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता - उरुग्वे X कोस्टा रिका
भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता - इंग्लंड X इटली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.