व्हिनस विल्यम्सने स्वीकारलं अँडी मरेचे आव्हान

Last Updated: Sunday, September 29, 2013 - 18:43

www.24taas.com, वृत्तसंस्था टोकियो
ब्रिटनच्या अँडी मरेने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष एकेरीचे सामने पाच सेटचे ठेवण्यात यावेत, अशी मागणी नुकतीच केली होती. हे आव्हान पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोचलेली अमेरिकेची आघाडीची खेळाडू व्हिनस विल्यम्सने स्वीकारले आहे.
व्हिनस म्हणाली,`पाच सेटपर्यंत खेळण्यात आम्हाला काही अडचण नाही. सध्या आम्ही तीन सेटपर्यंत खेळत असलो तरी, पाच सेटपर्यंत खेळणे काहीच कठीण नाही.` सातवेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविणारी जर्मनीची अँजेलिक केर्बरही म्हणाली, “माझ्या मते आम्ही तंदुरूस्त असून, पाच सेटपर्यंत सहज खेळू शकतो.”

अँडी मरेने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की पुरूषांच्या एकेरीचे सामने तीन सेटपर्यंत कमी करावेत किंवा महिलांचे सामने पाच सेटचे करावेत. मरेच्या या वक्तव्याविषयी महिला टेनिसपटूंकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013 - 18:41
comments powered by Disqus