नऊ वर्षाच्या मुलाचा खून

By Surendra Gangan | Last Updated: Monday, September 17, 2012 - 14:15

www.24taas.com,पुणे
पुणे जिल्ह्याचीस देहूरोड येथील अलकापुरी भागात आज सकाळी एका नऊ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आहे.
अलकापुरी येथे राहत असलेल्या अक्षय सुरेश कदम (९) असे या मृत मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घराजवळ असलेल्या केंद्रीय महाविद्यालयाच्या मैदानानजीक सापडला.
अक्षय हा निगडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होता.त्याचा गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अक्षयचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. अक्षयला वडिल नाहीत. त्याची आई घरकाम करते. पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.First Published: Monday, September 17, 2012 - 14:15


comments powered by Disqus