डॉक्टरांना मारहाण प्रकरणी तीन पोलीस निलंबित

सोलापूरमधील निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 2, 2014, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूरमधील निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.
सोलापूर शहरात शासकीय रूग्णालयात एका डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या निषेधार्थ मार्डनं संप पुकारलाय. त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था ढेपाळण्याची चिन्हं दिसत होती. या संपात राज्यातले जवळपास चार हजार डॉक्टर्स संपावर गेलेत. नागपूरमधल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधले ४५० निवासी डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यायत.
शासकीय रूग्णालयात डिलीव्हरीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्याची विनंती डॉक्टरला पोलिसांनी केली होती. मात्र, आपली शिफ्ट संपल्याचं कारण देत डॉक्टरने उपचाराला नकार दिला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत डॉक्टरकडून उपचार करून घेतले. या प्रकारमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीवर मार्डने आजपासून संप पुकारला. अद्याप मार्डनं संप मागे घेण्याची घोषणा केलेली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.