धक्कादायक : पुण्यात माणसाने केला कुत्र्यावर बलात्कार

माणूस पशू होत चालला आहे, असे आपण नेहमी म्हणतो.... पण माणसातील पशुत्व दिसले काल पुण्यात.... पुण्यात एका नराधमाने चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार घटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५२ वर्षीय हनुमंत माने याला अटक केली

प्रशांत जाधव | Updated: Nov 27, 2013, 05:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
माणूस पशू होत चालला आहे, असे आपण नेहमी म्हणतो.... पण माणसातील पशुत्व दिसले काल पुण्यात.... पुण्यात एका नराधमाने चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार घटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५२ वर्षीय हनुमंत माने याला अटक केली असून अनैसर्गिक कृत्य करणे आणि पशू अत्याचारविरोधी कायद्यांर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
नारायण पेठ येथे राहणारे भाजी विक्रेते संदीप राऊत सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घराच्या बालकनीत उभे होते. या दरम्यान त्यांना त्यांचा शेजारी राहणारा हनुमंत माने हा रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला फरफटत घरी नेत असल्याचे दिसले. यानंतर राऊत यांनी उत्सुकतेपोटी माने यांच्या घरात बघितले असता माने कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करताना आढळले.
या अमानूष घटनेची त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मानेला अटक केली असून माने हा विवाहीत असल्याचे समोर आले आहे. त्याला तीन मुली आणि दोन मुले असून त्याचे कुटुंब गावी राहतात. गेल्या २६ वर्षांपासून माने कामानिमित्त पुण्यात एकटेच राहत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.