चालकाचा नशेत धुडगूस; एक जण ठार

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 5, 2012 - 09:25

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा एका चालकानं धुडगूस घालत संतोष माने प्रकरणाच्या आठवणी जाग्या केल्या. यामध्येही एकाला नाहक आपल्या प्राणांना मुकावं लागलंय तर एक जण गंभीर जखमी झालाय.
पिंपरी-चिंचवडमध्ये एका मद्यपी कार चालकानं अक्षरश: धुडगूस घालत दोन दुचाकींना उडवलं. त्यात एकाचा मृत्यू झालाय. निशांत रतिलाल गुगळे असं या तरूणाचं नाव आहे. तर त्याचे वडील रतिलाल गुगळे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकाश धनवडे असं मद्यपी कारचालकाचं नाव आहे. ही घटना निगडीच्या भेळ चौकात काल रात्री साडे दहाच्या सुमाराला घडली. पोलिसांनी या आरोपीला अटक केलीय. पण, इथंही पोलिसांनी आरोपीला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आरोपी प्रकाश धनवडे याचा भाऊ मंत्रालयात असल्यामूळे त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याची चर्चा आहे मात्र, पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केलाय.

मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा संतोष माने यानं घातलेल्या मृत्युच्या तांडवाची आठवण जाग्या केल्या. पुण्यातील स्वारगेट डेपोतून बस पळवून संतोष माने या माथेफिरू बस ड्रायव्हरने धुमाकूळ घातला होता.First Published: Wednesday, September 5, 2012 - 09:25


comments powered by Disqus