पुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, September 30, 2013 - 15:19

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं कार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून हा अपघात घडला. अपघातात वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये एमबीए करत असलेल्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय. तर एक तरुणी जखमी आहे.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. आदित्य महावीर अगरवाल (वय २३), अंकित कमलेश गर्ग (वय २२, रा, सिरोही, राजस्थान), रोहिदास शशिकांत शुक्ला (वय २३, रा. कानपूर), गरिमा अजयकुमार गोयल (वय २२, रा. चंदिगढ) अशी मृतांची नावं आहेत. तर इशिका सिंगराव (वय २२, रा. जयपूर, राजस्थान) ही तरुणी जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल आणि त्याचे दोन मित्र, दोन मैत्रिणी रविवारी पहाटे पुण्याहून मुंबईकडे जात होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळ पहाटे तीन वाजता कार ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळं कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला जात मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, अंकितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी इशिकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण एमबीएच्या एफवायचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टेम्पो चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू हे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 30, 2013 - 15:19
comments powered by Disqus