अजित पवारांची दमबाजी

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, October 22, 2012 - 19:04

www.24taas.com, पुणे
‘उत्साहाच्या भरात काहीजण कार्यक्रम घेतात. मात्र, त्याचा काहीवेळा उगाचच पक्षाला धक्का पोहोचतो. पक्षाला धक्का पोहचवेल, असं काम करणाऱ्याला पक्षातून हाकलून दिलं जाईल’ अशी तंबीच आज अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे दिलीय. पुण्यांत सुरू असलेल्या् राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांवरदेखील ताशेरे ओढले.
‘आजारी असल्यावमुळे बडोद्याच्या अधिवेशनाला जाऊ शकलो नाही. लगेच प्रत्येाकांनं त्या‍चा वेगळा अर्थ काढायला सुरूवात केली. परंतू, अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची पवारसाहेबांकडून परवानगी घेतली होती तरीही अफवा पसरवण्याकत आल्या... विदर्भात आणि मुंबईत राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन पक्ष पोचवला पाहिजे. तिथे पक्ष वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. हल्ली कोणताही अधिकारी कामावर असताना काही बोलत नाही. मात्र, रिटायर होताच पोपटासारखा बोलतो’ असं पवार यांनी म्हटलंय.

यावेळीच माध्यमांवरही कडाडत ‘आम्ही सर्वांसमोर सादर करतो तो साधा कागद आणि दुसरा कोणी व्यक्ती तो दाखवत असेल तर तो पुरावा असतो. माध्यमांनी कोणत्यामही बातम्यांना महत्त्व देणं सुरू केलं आहे. आम्ही एवढया मोठया योजना आणतो. तो अभ्यास करूनच आणत असतो. पण कोणीतरी उठतो. अन् ती योजनाच चुकीची असल्याचे सांगतो. माध्यमांनी आपली भूमिका ओळखावी’
लवासा प्रकल्पाचे समर्थन करताना पुढील २० वर्षे सरकारला लवासापासून उत्पन्न मिळणार आहे. पडीक जमीन वापरासाठी नितीन गडकरी यांनी चांगला प्रस्ताव दिल्यासमुळेच त्यांना ती जमीन देण्याळत आली. यामध्ये गैरप्रकार झालेला नाही, असं अजित पवार म्हणाले.

First Published: Sunday, October 21, 2012 - 20:52
comments powered by Disqus