उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार Ajit pawar taunts Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार

उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

उध्दव ठाकरे हा मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं उचित नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला मारलाय.

जोपर्यंत अजित पवार यांच्या अकलेचा दुष्काळ संपणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचा दुष्काळ संपणार नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातल्या सभेत केली होती. त्यावर अजित पवारांनी हा टोला हाणलाय.

उद्धव ठाकरे यांनी या सभेत भुजबळांवर तोंडसुख घेतलं होतं. भुजबळ तुमच्यावर चिखल उडाला आहे. तुमचेच्याच खात्याचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणाले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 22:26


comments powered by Disqus