यासिन भटकळ आता महाराष्ट्र एटीएसच्या कस्टडीत

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 6, 2014, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.
पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, पुणे जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोट, मुंबईत १३ जुलै २०१२ मध्ये दादर, झवेरी बाज़ार आणि ऑपेरा हाऊस याठिकाणी झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि बनारसमध्ये संकटमोचन मंदिरात झालेला बॉम्बस्फोट या आणि अशा इतर बॉम्बस्फोटात यासीन भटकळचा हात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय.
त्याच अनुषंगानं राज्यात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या तपासासाठी यासिनची कस्टडी महाराष्ट्र एटीएसनं घेतलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.