महिलेला विवस्त्र करून पूजा मांडणाऱ्या मांत्रिकासह दोघांना अटक

राज्य सरकारने नुकताच संमत केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पहिला गुन्हा पुण्यात दाखल झालाय. वैयक्तिक समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी एका महिलेला विवस्त्र करून पूजा मांडण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 21, 2013, 03:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्य सरकारने नुकताच संमत केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पहिला गुन्हा पुण्यात दाखल झालाय. वैयक्तिक समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी एका महिलेला विवस्त्र करून पूजा मांडण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलीय.
यय्यद आलम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला या प्रकारात साथ देणा-या हमीदा शेख या महिलेलाही पोलिसांनी अटक केलीय. पिडीत महिला विश्रांतवाडी परिसरात राहणारी असून घरकाम करून पोट भरते. तिच्या जीवनातील समस्या दूर करतो, तसंच तिला मोठा धनलाभ प्राप्त करून देतो असं सांगून या मांत्रिकानं तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यासाठी घरामध्ये त्याच्यासोबत संपूर्ण विवस्त्र होऊन विधी करावे लागतील असं त्याने सांगितलं.
प्रत्यक्षात घरामध्ये गेल्यावर पिडीत महिलेला मांत्रिकाच्या हेतूविषयी शंका आली. त्याचप्रमाणे तिच्या आईच्या देखील हा प्रकार लक्षात आला. अशा परिस्थितीत पिडीत महिलेनं स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ