लहान मुलाने आईवरच केला चाकूने वार

पुण्यात एका १५ वर्षाच्या मुलानं आईवर चाकूनं वार केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. कारण आईनं त्याला इंटरनेटवर काम करू दिले नाही. या शुल्क कारणामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं प्रथम तपासातून कळतं.

PTI | Updated: Sep 10, 2014, 08:30 PM IST
लहान मुलाने आईवरच केला चाकूने वार title=

पुणे : पुण्यात एका १५ वर्षाच्या मुलाने आईवर चाकूनं वार केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. कारण आईनं त्याला इंटरनेटवर काम करू दिले नाही. या शुल्क कारणामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं प्रथम तपासातून कळतं.

या मुलांचा सर्वात जास्त वेळ हा स्मार्टफोन आणि कम्प्यूटरवर टाईमपास करण्यात जात असं. या घटनेवरून समजतं की, इंटरनेटचा लहान मुलांवर किती वाईट परिणाम होत आहे. हा मुलगा कम्प्यूटरवर सतत ऑनलाइन असे. यामुळे त्याचं अभ्यास, कुटूंब आणि मित्रांकडे दुर्लक्ष करत असून तो दिवसभरात इंटरनेटवर ऑनलाइन असे.

१५ वर्षाचा हा मुलगा विज्ञान शाखेत शिकणार असून हा तासंतास त्याच्या स्मार्टफोन आणि कम्प्यूटरवर वेळ घालवत असं. व्हॉट्स अॅप, वाइबर आणि विचॅट अॅप्लीकेशनवर ५००पेक्षा जास्त मित्र होते. पण त्यापैकी बहुतेक मित्रांना तो ओळखत देखील नाही, असे एक इंग्रजी वर्तमान पत्रातून सांगण्यात आले आहे.

या मुलाची आई ४७ वर्षाची असून ती एका शाळेत शिक्षका आहे. मुलाच्या अशा वागण्यामुळे त्याची आई खूप त्रासली होती. एक दिवस तिनं त्याचं कम्प्यूटर बंद केले. स्मार्टफोन देखील काढून घेतला. त्यामुळे त्याला खूप राग आला होता. या रागाच्या भरात त्यानं आईवर चाकूनं हल्ला केला.

 

पण आईचे दैव बलवत्तर होते म्हणून ती वाचली. तिला गंभीर दुखापत झाली नाही. मुलाने हल्ला करताच तिने आरडाओरडा केला ते ऐकून वडील धावत आले आणि त्यांनी त्याच्या हातातला चाकू ओढून घेतला. दुसऱ्या दिवशी त्याच्या आई-वडिलाने त्याला मुंबईतील भायखळा येथे साइकायट्रीक ट्रीटमेंटसाठी मसीना रुग्णालयात भर्ती केले होते. सुरुवातीला त्यानं रुग्णालयात जाण्यासाठी कोणताही विरोध केला नाही. पण रुग्णालयात गेल्यानंतर मात्र त्यानं आई-वडिलांच्या निर्णयावर विरोध दर्शविण्यासाठी स्वत:चे कपडे काढून टाकले.

हा मुलगा त्याच्या ऑनलाइन जीवनात ऐवढा वाहून गेला होता की, त्याचा मेंटल बॅलन्स देखील गेला होता. पण आता शॉक ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो पुन्हा पुण्यामध्ये गेला असून त्याला रिहॅबमध्ये जाऊन अजून तीन सेशन घेण्याची गरज आहे, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

पुण्यातील हा मुलगा स्मार्टफोन आणि कम्प्यूटरमध्ये तासंनतास त्याच्या रुममध्ये बंद राहत असे. १२ वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या वडिलानं त्याला फोन दिला होता. सुरुवातीला  तो ३० मिनिटापर्यंत सर्फिंग आणि गेमिंग करत होता. पण हळूहळू त्यानं फोनसाठी जास्त वेळ देऊ लागला.

इंटरनेटवरील मित्रांशी बोलण्यासाठी तो कधी कधी शाळेत देखील जात नसं. हळूहळू त्यानं त्याच्या मित्रांशी बोलनं आणि भेटणे देखील कमी केले होते. तो त्याच्या मित्रांशी बोलतांना तो रागिट होत असे. यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला एका बोर्डिंग शाळेत सुद्धा टाकले होते. पण तो तिकडे गेल्यानंतर आजारी पडला होता. मग त्याला रुग्णालयात अॅडमिट  करण्यात आले होते.

पण तो तिथून पळून घरी परत आला. आई-वडिलांना माहिती नव्हते की, बोर्डिंग शाळेतून पळून येण्यामागचे कारण म्हणजे इंटरनेट होते. तेथे इंटरनेट सहज उपलब्ध होत नाही. जेव्हा त्याचे आई-वडिल त्याच्याशी बोलत असे. तेव्हा तो म्हणे की, तुम्ही मला डिस्टर्ब करत आहात. मला एकट्याला सोडा. मग त्याच्या आई-वडिलांना त्याच्यावर लक्ष्य ठेवण्यास  सुरुवात केली. दरम्यान, त्यानं इंटरनेट रिचार्जसाठी चोरी करण्यास देखील सुरुवात केली होती. आई-वडिलांना त्याला डॉक्टरकडे दाखविण्याचा विचार केला होता. पण त्यानं डॉक्टरकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर त्यानं त्याच्या आईवर हल्ला केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.