आज पुण्यात `बस डे`

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, November 1, 2012 - 09:44

www.24taas.com, पुणे
पुणेकर आज फक्त बसनेच प्रवास करणार आहेत. पुण्यात आज ‘बस डे’ साजरा केला जातोय. त्यामुळे बहुतांश पुणेकर आज फक्त बसनेच प्रवास करणार आहेत. सकाळपासूनच या उपक्रमाला सुरूवात झाली आहे.
पुण्याची बिघडलेली वाहतूक व्यवस्था तसंच त्यातूनच होणारी वाहतुकीची कोंडी..या समस्यांवर उपाय म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलाय.या अनोख्या उपक्रमामुळे पुण्याच्या पीएमपीएललाही उर्जितावस्था येणार आहे. त्यामुळे या बस डेमध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय.
विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी यात सहभाग नोंदवलाय. पुणेकरांनी आज खासगी वाहनांनी प्रवास न करता फक्त बसनेच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलंय.First Published: Thursday, November 1, 2012 - 09:44


comments powered by Disqus