अंथरुणात लघवी केल्याबद्दल चिमुरड्याच्या गुप्तांगाला चटके!

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, November 13, 2013 - 17:34

www.24taas.com, झी मीड़िया, पुणे
पुण्यातील लोहगाव भागात बापानं आणि सावत्र आईनं अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याला अंथरुणात लघवी करतो म्हणून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. सावत्र आई मंजू हीला पोलिसांनी अटक केलीय. तर नराधम बाप फरार झालाय.
लोहगावच्या चव्हाण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोलूवर जितके वार आहेत, त्यापेक्षा अधिक वार त्याच्या मनावर झालेत. नराधम बाप आणि सावत्र आईनं घरात डांबून ठेवून त्याला बेदम मारहाण केलीय. कारण काय तर, फक्त अंथरूणात लघवी करतो इतकंच... गोलूच्या अंगावर आणि गुप्तांगावर ३५ चटके आहेत. हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी गोलूच्या कानातून रक्तस्त्रावही सुरू होता. गोलूला उलट टांगल्यावर झोका देवून भिंतीवर आपटलं जायचं. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे हा सगळा प्रकार उघड झाला.
गोलूचा नराधम बाप विजय गुप्ता हा दुसरी पत्नी मंजू हीच्यासोबत राहत होता. त्याची पहिली बायको म्हणजे गोलूची आई मध्य प्रदेशात राहते. गोलूला दिवाळीपूर्वीच पुण्यात आणलं होतं आणि गोलू तिच्या सावत्र आईसोबत राहत होता. गोलूचं सुदैवच म्हणा की त्याच्यावर होणा-या अत्याचाराची कुणकुण शेजाऱ्यांना लागणी आणि त्याची सुटका झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013 - 17:34
comments powered by Disqus