बाबांच्या टोल्यावर पवारांचा प्रतिटोला!

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीचा काय फायदा झाला? या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. वैयक्तिक लाभ सगळ्यात जास्त कुणाला झालाय तर तो पृथ्वीराज चव्हाण यांना झालाय. त्यामुळंच ते मुख्यमंत्री पदावर पोहचल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय.

Aparna Deshpande | Updated: Nov 10, 2013, 07:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीचा काय फायदा झाला? या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. वैयक्तिक लाभ सगळ्यात जास्त कुणाला झालाय तर तो पृथ्वीराज चव्हाण यांना झालाय. त्यामुळंच ते मुख्यमंत्री पदावर पोहचल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोलापूर इथल्या सासवड शूगर लिमिटेडच्या सहवीज प्रकल्प कार्यक्रमास आले असता पत्रकारांशी बोलत होते. राजकारणात पवार कुटुंबियांकडून घराणेशाही होत असल्याचा आरोप खोटा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. जनतेतून आम्ही निवडून आल्याचा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला का? असा सवाल लोकांनीच विचारायला पाहीजे, असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला लगावत केलं होतं. त्यालाच शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.