मराठी अभिनेत्रीला फसवून केले काँग्रेस नेत्याने लग्न

मंत्रालयात झालेल्या ओळखीतून पनवेलच्या नगरसेवकाने फसवून लग्न केल्याची तक्रार एका मराठी अभिनेत्रीने पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षात दिली आहे. या नगरसेवकाने पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तिच्याशी लग्न केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 29, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मंत्रालयात झालेल्या ओळखीतून पनवेलच्या नगरसेवकाने फसवून लग्न केल्याची तक्रार एका मराठी अभिनेत्रीने पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षात दिली आहे. या नगरसेवकाने पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तिच्याशी लग्न केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या अभिनेत्रीच्या अर्जाची शहानिशा करुन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्याकडे पाठवले आहे. या अभिनेत्रीची फसवणूक झाल्याचे तसेच संबंधित नगरसेवकाचे पहिले लग्न झाल्याचे प्राथमिक तपासावरुन दिसते आहे.
त्याने या अभिनेत्रीला दिलेले लग्नाचे नोंदणीपत्र आणि पहिल्या पत्नीसोबतच्या घटस्फोटाची कागदपत्रं खरी आहेत की खोटी हे पहावे लागणार असल्याचे महिला सहाय्या कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले.
या दोघांचे मुंबईमध्ये २३ जुलै २०१० रोजी लग्न झाले. १० सप्टेंबरला तिला एका महिलेचा दूरध्वनी आला. तिने आपण या नगरसेवकाची पहिली पत्नी बोलत असल्याचे सांगत तो दोन मुलांचा बाप असल्याचे सांगितले. या अभिनेत्रीने त्याला घरी आल्यावर त्याबद्दल विचारले. तेव्हा त्याने आमचा घटस्फोट झाल्याचे सांगून खोटे कागदपत्र दाखवले.

या अभिनेत्रीने त्याच्याकडे त्यांच्या लग्नाच्या नोंदणीपत्राबद्दल विचारले. त्याने चार दिवसांनी तिला लग्नाचे नोंदणीपत्र आणून दिले. एक वर्षानंतर तिला पहिल्या पत्नीचा दूरध्वनी आला. तेव्हा तिला घटस्फोट झालाच नसल्याचे समजले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.